Kolhapur Recruitment Saam Tv
naukri-job-news

Kolhapur Recruitment: कोल्हापूरकरांनो महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी; अर्ज कसा कराल? जाणून घ्या

Kolhapur Mahanagarpalika Recruitment: कोल्हापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या इस्टेट विभागाकडे जीवरक्षक आणि पंप ऑपरेटर पदासाठी भरती करण्यात येणार आहे. याबाबत जाहिरात उप आयुक्त महानगरपालिकेद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

१२ वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ११,००० ते १६,००० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय ४५ वर्ष असणार आहे. जीवरक्षक पदासाठी १२वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवाराला पोहता यायला हवे. तसेच संबंधित व्यक्तीला २ वर्षाचा कामाचा अनुभव असावा. पंप ऑपरेटर पदासाठी १२ वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवाराने इलेक्ट्रिशियन कोर्स पूर्ण केलेला असावा. महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये तुम्हाला अर्ज पाठवावा लागणार आहे.

६ सप्टेंबर २०२४ रोजी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासणे मैदानासमोर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

Dahi handi : एक गाव-एक दहीहंडी! पण फोडण्याची हटके पद्धत, इथे विहिरीत उडी मारून फोडली जाते दहीहंडी; Video

SCROLL FOR NEXT