Bank Job Saam Tv
naukri-job-news

Bank Job : या बँकेत पदवीधरांना मिळणार नोकरीची संधी; १६७३ जागा रिक्त, पगार ६० हजारपेक्षा जास्त

या बँकेत मिळतेय नोकरीची संधी, आजच अर्ज करा.

कोमल दामुद्रे

Bank Job : तुम्ही पदवीधर आहात, नोकरीच्या (Job) शोधात आहात तर तुमच्यासाठी आहे आनंदाची बातमी. स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पीओच्या एकूण १६७३ जागांवर भरती केली जाणार आहे. या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया या ऑनलाइन पध्दतीने आयोजित करण्यात आली आहे. यासाठी, उमेदवार एसबीआयची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

ही प्रक्रिया २२ सप्टेंबरपासून सुरु झाली असून इच्छुक उमेदवार या पदांसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत या पदासाठी अर्ज करु शकतात.

अर्ज प्रक्रिया कशी करायची ?

- अर्ज करण्यासाठी, अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या

- वेबसाइटच्या होम पेजवर Whats New च्या लिंकवर क्लिक करा.

- स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर्स ऑनलाइन फॉर्म २०२२ फॉर १६७३ पोस्ट या लिंकवर जा. आता क्लिक हिअरवर अप्लाय करा.

- पुढील अर्जाची प्रक्रिया करुन अर्ज भरु शकतात.

पात्रता व वय

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर असणे आवश्यक आहे. या पात्रतेला अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय २१ वर्ष व ३० वर्षांपेक्षा कमी हे निश्चित करण्यात आले आहे. तसेच या जागेसाठी उमेदवाराला ६३,८४० रुपये पगार (Salary) देण्यात येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 1st T20I: नाद करा पण आमचा कुठं! वर्ल्ड चॅम्पियन भारताचा दक्षिण आफ्रिकेला दणका

Supriya Sule Speech : पोर्शे कार अपघात प्रकरणात बदनामी केल्यामुळे शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा भरसभेत गौप्यस्फोट

6,6,6,6,6...द.आफ्रिकेत Sanju Samsonचं वादळ! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

SCROLL FOR NEXT