Job Opportunity  Saam Tv
naukri-job-news

Job Opportunity : होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये काम करण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती

Job Opportunity : सध्या सोशल मीडियावर नोकरीच्या संधी उपलब्ध असलेली माहिती उपलब्ध असते. जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्याची प्रत्येक तरुणाई चांगल्या नोकरीच्या शोधात आहे. अनेकदा या तरुणांना नोकरीच्या शोधात असताना अनेक समस्येमधून जावे लागते. यात शक्यतो बऱ्याचदा पात्रता किंवा शिक्षण असूनही तरुणांना माहितीच्या अभावामुळे चांगल्या नोकरीची संधी निघून जाते.

चला तर आज पाहूयात तरुणांसाठी सुवर्ण काही नोकरीच्या संधी(Opportunity). या संधीमुळे नोकरीची खरंच गरज असलेले तरुण असलेल्या नोकरीसाठी या ठिकाणी त्यांचे अर्ज करु शकतात. सध्या 'होम भाभा विज्ञान शिक्षण केंद्र' क्षेत्रात अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यामुळे सविस्तर माहिती जाणून घ्या कधीपर्यंत अर्ज करु शकाल.

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र- मुंबई

१ - प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक-बी

मुंबई येथे असलेल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात सध्या ''प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक-बी'' या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात असून फक्त यासाठी एकच जागा आहे. या पदांसाठी साधारण शैक्षणिक पात्रता ही 'बी.एस.सी' किंवा 'बी.एससी ऑनर्स' आणि 'बी.एस' एवढी आहे. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात यामध्ये असलेल्या प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक-बी या पदासाठी असलेली उमेदवाराची वयोमर्यादा साधारण २८ वर्ष असून मुलाखतीची तारीख २ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे. जर तुम्ही या पदांसाठी इच्छुक असाल तर तुम्ही hbcse.tifr.res.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकता.

२ - प्रकल्प सहाय्यक

होमी भाभा विज्ञान शिक्षण (Education)केंद्रात यामध्ये असलेल्या दुसऱ्या ''प्रकल्प सहाय्यक'' या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही अर्जदार हा पदवीधर असलेला आवश्यक असून या पदासाठी एकच जागा आहे. प्रकल्प सहाय्यक या पदासाठी उमेदवाराचे वय हे २८ वर्ष आवश्यक असून मुलाखतीची अंतिम तारीख २ ते १२ ऑगस्ट २०२४ आहे.

३- ग्रंथालय प्रशिक्षणार्थी

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात तिसरे ''ग्रंथालय प्रशिक्षणार्थी'' हे पद आहे. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदव्युत्तर पदवीमधील आवश्यक असून या पदासाठी दोन जागा आहे. प्रकल्प सहाय्यक या पदासाठी उमेदवाराचे वय हे २४ वर्ष आवश्यक असून मुलाखतीची अंतिम तारीख ५ ते १२ ऑगस्ट २०२४ आहे.

जाणून घ्या अर्ज अन् कुठे करायचा?

उमेदवारांनी या भरतीच्या असलेल्या पदांसाठी अर्ज (application)फक्त ऑनलाइनच करता येईल. यासाठी उमेदवारांना या 'hbcse.tifr.res.in''अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. उमेदवार या वेबसाईटवर गेल्यानंतर अर्ज करु शकत नाही तर या सर्व पदांबद्दल संपू्र्ण माहिती मिळवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रक्ताचं पाणी होईपर्यंत वहिनींच्या पाठीशी उभे राहू : हसन मुश्रीफ

भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फोडला, आवाजाने परिसर हादरला; बचाव पथक मदतीला धावलं

Monday Important Remedies: घरात पैशांची तंगी सुरू आहे? सोमवारी हे 5 उपाय करा, महादेवाच्या कृपेने होईल भरभराट

Jalna: जालन्यात ज्वालामुखी? जमिनीतून निघतोय ज्वलनशील पदार्थ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; पाहा VIDEO

Water Shortage : नागपूरकरांसाठी महत्वाची बातमी! २ दिवस शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद, कोणत्या परिसरांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT