ISRO announces 39 vacancies for scientist and engineer posts; online applications open till July 14, 2025 
naukri-job-news

ISRO Scientist Recruitment 2025: तुम्हालाही शास्त्रज्ञ बनायचंय? ISROमध्ये 'या' पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

ISRO Recruitment 2025: तुम्हालाही शास्त्रज्ञ व्हायचे आहे का? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) ने शास्त्रज्ञ/अभियंता पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

Bharat Jadhav

इस्रोमध्ये शास्त्रज्ञ बनणं हे बहुतेक तरुणांचं स्वप्न असतं. अशा उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही अभियांत्रिकीचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला अंतराळ संशोधनात रस असेल, तर इस्रो तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. इस्रोने अनेक पदांसाठी भरती जाहीर केलीय. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही आजच अर्ज करा.

भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) ने शास्त्रज्ञ/अभियंता पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २४ जून रोजी सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०२५ आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ISRO च्या अधिकृत वेबसाइट isro.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत शास्त्रज्ञ/अभियंता पदांच्या एकूण ३९ जागा भरल्या जाणार आहेत.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख - २४ जून २०२५

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १४ जुलै २०२५

अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख - १६ जुलै २०२५

परीक्षेची तारीख - अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये.

ISRO ICRB Recruitment 2025: पदांबाबत तपशील

शास्त्रज्ञ/अभियंता (सिविल): १८ पदे

शास्त्रज्ञ/अभियंता (विद्युत): १० पदे

शास्त्रज्ञ/अभियंता (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग): ९ पदे

शास्त्रज्ञ/अभियंता (आर्किटेक्चरल)-पीआरएल: १ पद

शास्त्रज्ञ/अभियंता (सिविल)-पीआरएल: १ पद

ISRO ICRB Recruitment 2025 Eligibility Criteria: पात्रता काय आहे?

उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६५% गुणांसह किंवा CGPA ६.८४/१० सह संबंधित अभियांत्रिकी शाखेत (इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल किंवा संगणक विज्ञान) बीई/बीटेक किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.

वयाची अट काय आहे?

अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच १४ जुलै २०२५ रोजी उमेदवारांचे वय २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांसाठी वयाची पात्रता ३३ वर्ष ठेवण्यात आलीय. ओबीसी उमेदवारांसाठी ३१ वर्षे असावे. माजी सैनिक आणि दिव्यांगजनांना सरकारी नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.

ISRO ICRB Recruitment 2025 Application Fee: अर्ज करण्यासाठी शुल्क किती

इस्रोची अधिकृत वेबसाइट isro.gov.in ला भेट द्य.

जर तुम्ही नवीन युझर असाल तर तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकून आधी तुमच्या नावाची नोंदणी करा.

त्यानंतर तुमच्या क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा.

तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती टाकून अर्ज भरा.

त्यानंतर फोटो, स्वाक्षरी केलेली प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करा.

त्यानंतर अर्जाचे शुल्क भरा.

आता तुमचा अर्ज फॉर्म तपासा आणि तो सबमिट करा.

पुढील वापरासाठी फॉर्मची प्रिंटआउट घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT