IPPB Recruitment Saam Tv
naukri-job-news

IPPB Recruitment: इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर

IPPB Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत भरती सुरु आहे.

Siddhi Hande

नोकरी शोधताय तर ही बातमी तुमच्यासाठी. सध्या इंडियन पोस्ट पेमेंट बँक लिमिटेडमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत सर्किल बेस्ड एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १ मार्चपासून सुरु झाली आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२५ आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी www.ippbonline.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील ही भरती वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणार आहे. महाराष्ट्रात एकूण ४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत त्या राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र असायला हवे. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१-३५ असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ३०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १५० रुपये शुल्क भरायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आ. संजय गायकवाड यांचा शेकापने केला निषेध

Pankaja Munde: पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा, बड्या नेत्याच्या विधानाने राजकारणात खळबळ

Mumbai : 'मला हिंदू मुली आवडतात...' अश्लील व्हिडिओ पाठवले, शारीरिक संबंधांची मागणी; नाशिकनंतर मुंबईत कॉर्पोरेट जिहाद

Jio Recharge: Jioचा स्पेशल रिचार्ज प्लान, 448 रुपयांमध्ये 3 महिन्यांची वैधता

Shaktipeeth Expressway: नागपूर ते गोवा फक्त ९ तासात पोहोचणार; १३ जिल्ह्यातून जाणार शक्तीपीठ महामार्ग; सिंधुदुर्गातील या गावांचा समावेश

SCROLL FOR NEXT