IPPB Recruitment Saam Tv
naukri-job-news

IPPB Recruitment: शिक्षण पूर्ण झालंय? इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत आहे नोकरीची संधी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

India Post Payment Bank Recruitment 2025: इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. सर्कल बेस्ड एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (IPPB Recruitment)

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत सर्कल बेस्ड एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. २१ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेतील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. ५१ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी तुम्ही careers@ippbonline.in या ईमेल आयडीवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२५ आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी अवघे ५-६ दिवस उरले आहेत. (Indian Post Payment Bank Recruitment)

बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. पोस्ट ऑफिसच्या बँकिंग सर्व्हिसमध्ये ही भरती करण्यात आली आहे. त्यामुळे तुमचे जर नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण झाले असेल तर लवकरात लवकर अर्ज करा. तुम्हाला या नोकरीसाठी ३०,००० रुपये मासिक वेतनदेखील मिळणार आहे.

हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये भरती

सध्या हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्येही विजिटिंग कंसल्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही hal-india.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक विजिटसाठी ७००० रुपये मानधन मिळणार आहे. या नोकरीसाठीही अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२५ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरातील विद्यार्थ्याला अखेर बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळले; पोलीस कर्मचाऱ्याचा काही क्षणात मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT