Indian Overseas Bank Saam Tv
naukri-job-news

Indian Overseas Bank: शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांसाठी नोकरीची संधी! इंडियन ओव्हरसीज बँकेत अधिक जागांसाठी सुरु आहे भरती; असा करा अर्ज

Indian Overseas Bank Recruitment 2024: इंडियन ओव्हरसीज बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. ५५० जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेत अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिस पदासाठी निवड झाल्यास तुम्हाला बँकेच्या कामाबाबत सर्व काही शिकवण्यात येणार आहे. ज्या तरुणांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहेत त्यांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.

इंडियन ओव्हरसीज बँकेत ५५० जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. यासाठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीआधी अर्ज करावेत.

इंडियन ओव्हरसीज बँकेत अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अप्रेंटिस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १५,००० रुपये स्टायपेंड देणार आहे. नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ९४४ रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.https://www.iob.in/ या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

SCROLL FOR NEXT