IOCL Recruitment Saam Tv
naukri-job-news

IOCL Recruitment: ग्रॅज्युएट आहात? इंडियन ऑइलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा?

IOCL Recruitment 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. इंडियन ऑइलमध्ये अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. नुकतेच शिक्षण पूर्ण झाले असेल तर ही उत्तम संधी आहे. इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी २२ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करु शकतात.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान दिल्ली येथे अप्रेंटिस पदासाठी भरती आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.iocl.com या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करायचा आहे. (Indian Oil Corporation Recruitment)

या भरती मोहिमेत अर्ज करण्यासाठी १२वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत ITI / NCVT सर्टिफिकेट/संबंधित क्षेत्रात ३ वर्षांचे पॉलिटिकल इंजिनियरिंग डिप्लोमा किंवा आर्ट्स, कॉमर्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. १८ ते २४ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला दहावी पासचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

याचसोबत ग्रॅज्युएशनचे प्रणामपत्र, डिग्री सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

तसेच जातीचे प्रणापत्र, पीओडब्ल्यूबीडी प्रणाणपत्र, पॅन कार्ड आधार कार्ड हे कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.

याचसोबत तुमचा पासपोर्ट साइज फोटो आणि सही अपलोड करायचा आहे.

या पदासाठी अर्ज करताना सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे. तिथे जाऊन अप्रेंटिसशिप लिंकवर क्लिक करायचा आहे. याआधी रजिस्ट्रेशन करुन लॉग इन करा. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करा. यानंतर शुल्क भरा.

ज्या तरुणांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांना चांगल्या कंपनीत नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. इंडियन ऑइल ही सरकारी कंपनी आहे. या कंपनीत करिअरची सुरुवात करु शकतात. याचसोबत वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही शिकू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT