Indian Coast Guard Recruitment Saam Tv
naukri-job-news

JOB: इंडियन कोस्ट गार्डमध्ये नोकरीची संधी; मिळणार २ लाख रुपये पगार; पात्रता आणि अटी जाणून घ्या

Indian Coast Guard Recruitment: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन कोस्ट गार्डमध्ये सध्या भरती सुरु आहे. ऑफिसर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

इंडियन कोस्ट गार्डमध्ये नोकरीची चांगली संधी आहे. इंडियन कोस्ट गार्डमध्ये सिनियर सिविलियन स्टाफ ऑफिसर पदासाठी भरती करण्यात येणार आहे. इंडियन कोस्ट गार्जमध्ये ३८ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

सिविलियन स्टाफ ऑफिसर (लॉजिस्टिक्स), असिस्टंट डायरेक्ट (राजभाषा), सेक्शन ऑफिसर, सिविलियन गजटेड ऑफिसर (लॉजिस्टिक्स), स्टोरमध्ये फायरमॅन आणि स्टोर कीपर ग्रेड I पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. (Government Job)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी indiancoastguard.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज अधिसूचना जाहीर झाल्यापासून ६० दिवसांमध्ये म्हणजेच २ महिन्यात अर्ज करायचा आहे.

सिनियर सिविलियन स्टाफ ऑफिसर पदासाठी ३ रिक्त जागा आहे. सिविलियन स्टाफ ऑफिसर पदासाठी १२ जागा, असिस्टंट डायरेक्टर पदासाठी ३ रिक्त जागा आहे.स्टोर फायरमॅन पदासाठी २ रिक्त जागा आहेत. ३८ पदांसाठी भरती केली जाणार आहे.

सिविलियन स्टाफ ऑफिसर ते स्टोर किपर ग्रेड या पदासाठी उमेदवारांना जास्तीत जास्त २,०९,२०० रुपये मानधन मिळणार आहे. या नोकरीसाठी पदानुसार वेतन मिळणार आहे. (Indian Coast Guard Recruitment)

अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम उमेदवाराने indiancoastguard.gov.in या वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर होमपेजवर भरती या ऑप्शनवर क्लिक करा.

  • त्यानंतर उमेदवाराने आवश्यक माहिती भरुन कागदपत्रे अपलोड करा.

  • यानंतर अर्ज करा. त्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढा. (Indian Coast Guard Job)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

Anant Chaturdashi 2025: विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पा 'या' राशींना करणार मालामाल; अनंत चतुर्दशीला 4 शुभ महासंयोग देणार पैसा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कुटुंबीय असमाधानी; जरांगे पाटलांची घेणार भेट

SCROLL FOR NEXT