Indian Bank Job Saam Tv
naukri-job-news

Bank Jobs: १०वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी; इंडियन बँकेत भरती सुरु; अशा पद्धतीने करा अर्ज

Indian Bank Recruitment: १०वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालंय अन् नोकरी शोधताय तर ही बातमी तुमच्यासाठी. इंडियन बँकेत सध्या अटेंडेंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. सध्या इंडियन बँकेत भरती निघाली आहे. इंडियन बँकेत (Indian Bank) अटेडेंट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती तामिळनाडूमधील तिरुवन्नामलाई या जिल्ह्यात निघाली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. इच्छुकांनी indianbank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

इंडियन बँकेतील या नोकरीसाठी (Indian Bank Recruitment)तुम्ही ३० एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अधिसूचना वाचावी. त्यानंतरच अर्ज करावेत.

इंडियन बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

इंडियन बँकेतील या नोकरसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २२ ते ४० वर्षे असावी.या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.

तुम्हाला नोकरीसाठी अर्ज करताना अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने पाठवायची आहेत. इच्छुकांनी कागदपत्रे भारतीय बँक ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, १४३/७३, पहिला मजला, रामलिंगनार मेन रोड, तिरुवन्नामलाई ६०६ ६०१, तमिळनाडू येथे अर्ज पाठवायचा आहे.या नोकरीसाठी स्थानिक उमेदवारांनी अर्ज करावेत.

IRCTC मध्ये भरती (IRCTC Bharti)

सध्या आयआरसीटीसीमध्ये नोकरीची संधी आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर पदांसाठी ही भरती केली जात आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.आयआरसीटीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२५ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: : बीडच्या माजलगाव येथील लाहमेवाडी येथे टायर जाळत रस्ता रोको आंदोलन प्रशासनाचा निषेध

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT