Income Tax Bharti Saam Tv
naukri-job-news

Income Tax Bharti: आयकर विभागात काम करण्याची संंधी; पात्रता १०वी, १२वी पास; जाणून घ्या पगार आणि इतर पात्रता

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.भारतीय आयकर विभागात सध्या भरती सुरु आहे. ग्रूप सी पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे.

१०वी, १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. मुख्य आयकर आयुक्त (सीसीए) आणि आयकर विभागाद्वारे ही जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे.

इन्कम टॅक्ससारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. १० वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. १८ ते २५ वयोगटातील उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतात. कॅन्टीन अटेंडंट पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.

इन्कम टॅक्स विभागात २५ रिक्त पदे भरण्यात येणार आहे. तमिळनाडू आणि पुद्दुचेरी प्रदेश या ठिकाणी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रधान मुख्य आयकर आयुक्त, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या ठिकाणी त्यांना पोस्ट केले जाऊ शकते. (Income Tax Department Bharti)

या भरतीबाबत सर्व माहिती https://tnincometax.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे. २२ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना १८००० ते ५६९०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. (Income Tax Recruitment)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kurkuri Bhendi: लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांत बनवा कुरकुरी भेंडी

VIDEO : 'लाडकी बहीण'वरून गडकारींचा सरकारला घरचा आहेर; केलं मोठं विधान !

Maharashtra News Live Updates : मणिपूरमधील नागरिकांनी घेतली शरद पवारांची भेट

Krushna Abhishek Net Worth: आलिशान घर ते लग्झरी गाड्या, कपिल शर्माला ही टक्कर देत आहे 'हा' कॉमेडियन कलाकार; जाणून घ्या संपत्तीचा आकडा किती?

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात तुफान राडा, कोकण हार्टेड गर्ल अभिजीतवर संतापली; नेमकी कोणी टाकली ठिणगी?

SCROLL FOR NEXT