IDBI Bank Job Saam Tv
naukri-job-news

IDBI Recruitment: IDBI बँकेत नोकरी करण्याची संधी; पगार मिळणार १.९७ लाख; अर्ज कसा करावा?

IDBI Recruitment 2026: आयडीबीआय बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आयडीबीआय बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

IDBI मध्ये नोकरीची संधी

३३ पदांसाठी भरती सुरु

स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती

जर तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी.आयडीबीआय बँकेत भरती जाहीर करण्यात आली आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

३३ पदांसाठी भरती

आयडीबीआयमध्ये एकूण ३३ पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये आयटी, एमआयएस, सिक्युरिटी, रिस्क मॅनेजमेंट किंवा ऑडिट विभागात नोकरी मिळणार आहे. तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये काम करायची संधी मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला चांगला पगारदेखील मिळणार आहे.

आयडीबीआयमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २५ मार्च २०२६ रोजी सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही idbibank.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ एप्रिल २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्याआधी अर्ज करायचे आहेत.

आयडीबीआयमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरत होणार आहे. यामध्ये आयटी आणि एमआयएससाठी १९ पदे आहे, सिक्युरिटी ग्रेड डी पदांसाठी ८ जागा रिक्त आहेत. रिस्क मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन सिस्टीमसाठी ४ पदे, ऑडिट आणि इन्फॉर्मेशन सिस्टीम ग्रेड सीसाठी २ जागा रिक्त आहे. या भरतीत ज्युनिअर ते सीनियर सर्व पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यामुळे तरुणांसाठी नोकरीची ही उत्तम संधी आहे.

पगार

आयडीबीआयमधील या नोकरीसाठी २५ ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १,२४,००० ते १,९७,००० रुपये पगार मिळणा आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयकडून संशयित विद्यार्थ्यांची चौकशी

Skipping Benefits: वजन कमी करायचंय? मग रोज सकाळी दोरी उड्या मारा, होईल हा बदल

Belapur : हिरव्यागार डोंगरमाथ्यावर वसलाय भव्य किल्ला, पनवेल गाडी पकडा अन् बेलापूरला उतरा

Pregnancy Planning Tips: लवकरच मिळेल गूड न्यूज! बाळासाठी प्रयत्न करताना महिलांनी 'या' १० टिप्स ठेवाव्यात लक्षात

ITR Filing Mistakes: आयटीआर फाइल करताना 'या' चुका कधीच करु नका, अन्यथा भरावा लागेल दंड

SCROLL FOR NEXT