पुण्यातील एफसी रोडवर धक्कादायक घटना
नोकरी गेल्यामुळे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
भररस्त्यात ब्लेडने गळ्यावर वार केले
गंभीर जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू
पुण्यामध्ये एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वत:च्याच गळ्यावरून ब्लेड फिरवल्याची धक्कादायक घटना घडली. नोकरी गेल्यामुळे नैराश्येत येऊन या तरुणाने हे कृत्य केले. पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर ही घटना घडली. भररस्त्यात या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे खळबळ उडाली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य सातपुते (वय ४१ वर्षे) असं या तरुणाचे नाव आहे. तो मुळचा मुंबईतील बोरीवलीमध्ये राहणारा आहे. पुण्यामध्ये तो नोकरी करत असून भोसले नगर भागात राहतो. हातातून नोकरी गेल्यामुळे आदित्य चिंतेत आला. शनिवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास आदित्य पुण्यातील एफसी रोड परिसरातील खाऊ गल्लीत आला. त्याठिकाणी त्याने हे धक्कादायक कृत्य केले.
शनिवारी रात्री आदित्यने स्वतःच्या हाताने स्वतःच्या गळ्यावर ब्लेडच्या सहाय्याने वार करून घेतले. या घटनेत आदित्य गंभीर जखमी झाला आणि जास्त रक्तस्राव होऊ लागला. या घटनेमुळे एफसी रोडवर एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी झालेल्या आदित्यला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नोकरी गेल्याच्या नैराश्यातून त्याने हे कृत्य केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.