IDBI Bank Jobs 2024
IDBI Bank Jobs 2024 Saam Tv
naukri-job-news

IDBI Bank Jobs 2024 : आयडीबीआय बँकेत तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल १९०००० हजार मिळणार पगार, आजच अप्लाय करा

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी आहे. जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात किंवा फायनान्समध्ये आपले करिअर करायचे असेल तर तुम्हाला चांगली संधी आहे. IDBI बँकेत विविध पदांसाठी भरती सुरु आहे. इच्छुक उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

IDBI बँकेत ३ पदांसाठी भरती सुरु आहे. उपमहाव्यवस्थापक पदांसाठी ३ जागा रिक्त आहेत तर सहायक महाव्यवस्थापक पदासाठी १५ जागा रिक्त आहे. व्यवस्थापक पदांसाठी १३ जागा रिक्त आहेत.त्यामुळे तुम्ही या जागांसाठी अर्ज करु शकतात.

२५ ते ४५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असेल. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे.

उपमहाव्यवस्थापक पदासाठी १, ९०,००० रुपये वेतन देण्यात येणार आहे तर सहायक महाव्यवस्थापक पदासाठी १,५७,००० रुपये वेतन देण्यात येणार आहे. तर व्यवस्थापक पदासाठी १,१९,००० वेतन दिले जाणार आहे. याबाबत सर्व माहिती https://www.idbibank.in/ या वेबसाइटवर दिली आहे. यासाठी तुम्ही वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. यासाठी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल.

याचसोबत तुम्ही आयबीपीएस अंतर्गत होणाऱ्या बँकेच्या परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. आयबीपीएस लिपिक पदांसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत लेखी स्वरुपात परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा ११ सरकारी बँकासाठी असते. जर तुम्ही या परीक्षेत पास झालात तर तुम्हाला सरकारी बँकेत नोकरीची संधी मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jui Gadkari : जुई गडकरी म्हणजे सौंदर्याची खाण...

Mumbai Local Train News: मुंबईत पावसाची विश्रांती, लोकल ट्रेनची वाहतूक पूर्ववत; गाड्या 10-15 मिनिटे उशिरा

CNG -PNG Price: सीएनजी-पीएनजीच्या दरात होणार वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; जाणून घ्या नवे दर

Marathi Live News Updates: मालेगाव-मनमाड रोडवरील नांदगाव फाटाजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात

VIDEO: Worli Hit and Run प्रकरणी कोर्टाचा पोलीसांना झटका, राजेश शहा यांना जामीन मंजुर

SCROLL FOR NEXT