HPCL Recruitment Saam Tv
naukri-job-news

HPCL Recruitment: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी; ३७२ पदांसाठी भरती; पगार २,८०,००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Hindustan Petroleum Corporation Recruitment: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ३७२ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये ३७२ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती वेगवेगळ्या पदांसाठी केली जाणार आहे. फ्रेशर्सपासून ते अनुभवी प्रोफेशनलपर्यंत अनेकांसाठी ही भरती केली जाणार आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियमने अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे. हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह, मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल / सिव्हिल / केमिकल इंजिनियर्स, लॉ ऑफिसर, सेफ्टी ऑफिसर, सिनियर ऑफिसर आणि मॅनेजर पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

या भरती मोहिमेत ३७२ पदे भरली जाणार आहे. १ जून ते ३० जून २०२५ पर्यंत तुम्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित क्षेत्रात डिप्लोमा, बी.टेक आणि लॉ डिग्री प्राप्त केलेली असावी.

हिंदुस्तान पेट्रोलियममधील या नोकरीसाठी तुम्ही www.hindustanpetroleum.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे केली जाणार आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियममधील फ्रेशर्ससाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२५ आहे. तर अनुभवी उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२५ आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

हिंदुस्तान पेट्रोलियममधील ही भरती वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. फ्रेशर्ससाठी काही जागा राखीव आहेत तर काही जागा या अनुभवी उमेदवारांसाठी राखीव आहेत.त्यामुळे पदानुसार तुम्ही अर्ज करावेत. या नोकरीसाठी एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, ज्युनिअर असिस्टंट पदासाठी ३०,००० ते १,२०,००० रुपये पगार मिळणार आहे. असिस्टंट ऑफिसर पदासाठी ४०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे.इंजिनियर पदासाठी ५०,००० ते १,६०,००० रुपये पगार मिळणार आहे. असिस्टंट मॅनेजर पदासाठी ७०,००० ते २,००,००० रुपये पगार मिळणार आहे.डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी १,२०,००० ते २,८०,००० रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनानंतर सोन्याचे दर बदलले, प्रति तोळा इतक्या रूपयांवर पोहचले, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra News Live Update: पीएम मोदींच्या आव्हानानंतर शरद पवारांची पोस्ट

Maharashtra politics : राष्ट्रवादीत 'भूकंप'; पटेल-तटकऱ्यांची पदे कापली? पार्थ आणि जय पवारांची एन्ट्री, सुनेत्रा पवारांचे स्पष्टीकरण

Navi Mumbai Picnic Spot: खारघरचं सेंट्रल पार्क ते बेलापूरचं पारसिक हिल, नवी मुंबईतील ही 5 ठिकाणे पर्यटकांना घालतायेत भुरळ

चुका तुमच्या अन् भुर्दंड जनतेला का? PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे कडाडले

SCROLL FOR NEXT