HAL Recruitment Saam TV
naukri-job-news

HAL Recruitment: हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ९५००० रुपये पगार;पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Hindustan Aeronautics Limited Recruitment: हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. एचएलएलमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. नोकरीच्या शोधात असणारे तरुणांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत. सहायक आणि ऑपरेटर पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत सर्व माहिती हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिटिमेट एक्सेसरीज डिवीजन, लखनऊ येथे ही भरती जाहीर करण्यात आली आहे.hal-india.co.in या वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२४ आहे.

या भरतीअंतर्गत १४ पदे भरती केली जाणार आहे. सहायक पदासाठी उमेदवाराने एमए/एमएससी/एमकॉम केलेले असावे. ऑपरेटवर पदासाठी उमेदवाराने एनएसीमध्ये ३वर्ष काम किंवा आयटीआय सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २८ पर्यंत असावे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला २२,००० ते ९५,०००० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.सहायक आणि ऑपरेटर पदासाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराला २०० रुपये फी भरावी लागणार आहे. यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना फीमध्ये सूट मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT