NCERT Recruitment Saam Tv
naukri-job-news

NCERT Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी, NCERT मध्ये भरती; मिळणार ६०००० पगार; अर्ज कसा करावा?

NCERT Recruitment 2025: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एनसीईआरटीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. तुमच्यासाठी सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. नॅशनल काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. मीडियामध्ये करिअर करण्याची ही उत्तम संधी आहे.

एनसीईआरटीने अँकर, व्हिडिओ एडिटर, कॅमेरामॅनसह अनेक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी तुम्ही www.ncert.nic.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

एनसीईआरटीने जारी केलेल्या माहितीनुसार, या नोकरीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नाही. उमेदवारांचे थेट इंटरव्ह्यूद्वारे सिलेक्शन होणार आहे. या नोकरीसाठीते इंटरव्ह्यू १७ ते २२ मार्चपर्यंत होणार आहे.

अँकर पदासाठी १७ मार्च रोजी इंटरव्ह्यू आहे. प्रोडक्शन असिस्टंट पदासाठी १८ मार्च २०२५ रोजी इंटरव्ह्यू होणार आहे. व्हिडिओ एडिटर पदासाठी १९ मार्च, साउंट रेकॉर्डिस्ट पदासाठी २० मार्च रोजी इंटरव्ह्यू होणार आहे. कॅमेरामॅन पदासाठी २१ मार्च रोजी मुलाखत होणार आहे.

अँकर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला हिंदी आणि इंग्रजी भाषा येणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. प्रोडक्शन असिस्टंट पदासाठी डिप्लोमा असणे अनिवार्य आहे. याचसोबत २ वर्षांचा अनुभव असायला हवा.

ग्राफिक असिस्टंट पदासाठी फाइन आर्ट्समध्ये ग्राफिक आणि अॅनिमेशन डिप्लोमा केलेला असावा. या नोकरीसाठीच्या इंटरव्ह्यूसाठी दिलेल्या तारखेला सकाळी ९ वाजता CIET, NCERT, नई दिल्ली येथे उपस्थित राहावे लागेल. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ६० हजार रुपये पगार मिळणार आहे.याबाबत अधिक माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT