Agniveer Bharti 2025: इंडियन आर्मीत नोकरीची संधी, अग्नीवीर भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा? जाणून घ्या

Indian Army Agniveer Bharti 2025: भारतीय सैन्यात काम करण्याची संधी तरुणांकडे आहे. अग्नीवीर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज कसा करावा? ते जाणून घ्या.
Agniveer Bharti 2025
Agniveer Bharti 2025Saam Tv
Published On

देशसेवा करायची अनेक तरुणांची इच्छा असते. देशसेवा करण्यासाठी अनेकजण इंडियन आर्मीसाठी तयारी करत असतात. भारतीय सैन्यात काम करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. इंडियन आर्मीत सध्या अग्नीवीर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या अग्नीवीर पदांसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तु्म्हाला joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२५ आहे. (Agniveer Bharti)

Agniveer Bharti 2025
IPPB Recruitment: इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर

भारतीय सैन्यात अग्निवीर जनरल ड्युटी, टेक्निकल, क्लर्क आणि स्टोर कीपल टेक्निकल, ट्रेड्समॅन, सैनिक फार्मा, सैनिक टेक्निकल नर्सिंग सहायक आणि महिला पोलिस पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. याचसोबत हवलदार, जेसीओ (रिलीजियस टीचर), जेसीओ (कॅटरिंग) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

अग्नीवीर भरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.यामध्ये एकच उमेदवार दोन पदांसाठी अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करताना २५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहेत. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरावे लागणार आहे.

अग्नीवीर भरतीसाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे. १६०० मीटरची रेस आणि चार कॅटेगरीत निर्धारित करण्यात आली आहे. ही रेस पूर्ण करण्यासाठी आता अधिक ३० सेकंडचा वेळ मिळणार आहे. म्हणजेच ६ मिनिट १५ सेकंडमध्ये तुम्ही रेस पूर्ण केल्यावर क्वालिफाई केले जाणार आहे.

Agniveer Bharti 2025
BOI Recruitment: बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; १५९ रिक्त पदे; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

अग्नीवीर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १०वीची मार्कशीट लावणे गरजेचे आहे. याचसोबत डोमिसाइल सर्टिफिकेटदेखील जमा करावे लागणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Agniveer Bharti 2025
Desk Job Risks: तासनतास बसून काम करण्याचे दुष्परिणाम; आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com