FSSAI Recruitment 2025 
naukri-job-news

Government Job: महिना २ लाख रुपये पगार हवा? मग आजच करा FSSAI मध्ये अर्ज; जाणून घ्या जाहिरात अन् अर्जाची संपूर्ण प्रक्रिया

FSSAI Recruitment 2025: जर तुम्हाला फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये काम करायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यासह अनेक पदांसाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

Bharat Jadhav

FSSAI Job: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने प्रशासकीय अधिकारी पदासह इतर विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. रिक्त असलेल्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार FSSAI च्या अधिकृत वेबसाइट fssai.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया १५ एप्रिलपासून म्हणजेच आजपासून सुरू झालीय. तर ३० एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. या भरती अंतर्गत, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात एकूण ३३ पदे भरली जाणार आहेत.

रिक्त जागांचा तपशील

संचालक: २ पदे

सहसंचालक: ३ पदे

वरिष्ठ व्यवस्थापक: २ पदे

व्यवस्थापक: ४ पदे

सहाय्यक संचालक: १ पद

प्रशासकीय अधिकारी: १० पदे

वरिष्ठ खाजगी सचिव: ४ पदे

असिस्टंट मॅनेजर: १ पद

सहाय्यक: ६ पदे

अर्ज ऑफलाइन देखील पाठवावा लागेल

FSSAIनुसार, ऑनलाईन करण्यात आलेल्या अर्जाची कॉपी, नियोजित फॉर्मेटमध्ये नियोक्ता किंवा कॅडर नियमन प्राधिकरणद्वारे प्रमाणपत्र आणि अन्य सहायक प्रमाण पत्र किंवा कागदपत्रे योग्यप्रकारे सहाय्यक निदेशक, भर्ती प्रकोष्ठ, एफएसएसएआय मुख्यालय, ३१२, तिसरा मजला, एफडीए भवन, कोटला रोड नवी दिल्ली या पत्त्यावर अर्जाची कॉपी पाठवावी लागेल. हे अर्ज १५ मे पर्यंत कार्यालयात पोहचणे आवश्यक आहे.

नोकरीची जाहीरातीसाठी येथे क्लिक करा

पात्रता निकष काय

केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा विद्यापीठ किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा निम-सरकारी, वैधानिक किंवा स्वायत्त संस्थेतील अधिकारी संचालक पदासाठी अर्ज करू शकतात, परंतु ते त्याच पदावर असले पाहिजेत किंवा त्यांना त्याच विभागात किंवा समतुल्य पदाचा पाच वर्षांचा अनुभव असावा.

याशिवाय प्रशासन, वित्त, मानव संसाधन विकास तसेच दक्षता विभागात १५ वर्षांचा अनुभव असलेले लोक देखील यासाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १,२३,१०० ते २,१५,९०० रुपये पगार मिळेल.

त्याचप्रमाणे जर कोणी सहाय्यक पदासाठी अर्ज करत असेल तर त्याच्याकडे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा सरकारी विद्यापीठ किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाची पदवी असावी किंवा निम-सरकारी, वैधानिक किंवा स्वायत्त संस्थेत अधिकारी म्हणून १० वर्षांचा अनुभव किंवा प्रशासन, मानव संसाधन विकास किंवा दक्षता विभागात त्याच पदावर असल्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव असावा. अधिक माहितीसाठी, उमेदवार FSSAI ची अधिकृत वेबसाइट fssai.gov.in ला भेट देऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT