Railway Recruitment: तब्बल ९००० तरुणांना मिळेल सरकारी नोकरी; त्वरीत करा अर्ज, जाणून घ्या अ‍ॅप्लिकेशनची प्रक्रिया

Railway Job Application Process: रेल्वेमध्ये लोको पायलटसाठी भरती निघाली असून त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अर्ज करता येणार आहेत.
Railway Recruitment
Railway Job Application Process
Published On

सरकारी नोकरीच्या शोधार्थ आहात का? हो, मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. चांगल्या पगाराची सरकारी नोकरी तुम्हाला हवी आहे? तर तुमच्यासाठी भारतीय रेल्वेने सुवर्ण संधी आणलीय. रेल्वेमध्ये 'असिस्टंट लोको पायलट'साठी भरती केली जाणार आहे. या जागा एक-दोन नाही तर तब्बल ९००० हजार भरल्या जाणार आहेत. रेल्वे भरती मंडळाने यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज नोंदणीची प्रक्रिया १० एप्रिलपासून सुरू झालीय.

भारतीय रेल्वेमध्ये 'लोको पायलट', व्हायचे असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल. नोकरीसाठी अर्ज करण्याआधी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटवरून तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकतात. लक्षात घ्या, या भरतीसाठी फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यामुळे वेळ न गमावता लगेचच सायबर कॅफेवर जा आणि नोकरीचा अर्ज करा. दरम्यान या भरतीद्वारे 'रेल्वे असिस्टंट लोको पायलट'च्या ९९०० पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मे आहे.

वय काय लागेल बुवा?

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे असावं लागेल. आरक्षण श्रेणीतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल. या भरतीमध्ये उमेदवारांचे वय १ जुलै २०२५ नुसार मोजले जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित क्षेत्रात आयटीआय उत्तीर्ण/पदवी/पदविका पदवी असणे आवश्यक आहे.

परीक्षेसाठी काय लागेल शुल्क

या भरतीसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला परीक्षा शुल्क भरावे लागेल. हे शुल्क प्रत्येक प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे. जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ५०० रुपये आणि एसटी/एससी, पीडब्ल्यूडी, माजी सैनिकांना २५० रुपये शुल्क भरावे लागतील.

Railway Recruitment
ESIC Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ESIC मध्ये ५५८ रिक्त पदांसाठी भरती; पगार ७८०००; अर्ज कसा करावा?

अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

सर्वप्रथम तुम्हाला RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

त्यानंतर RRB ALP भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करा.

आता नोंदणी लिंकवर जा आणि स्वतःची नोंदणी करा.

नंतर अर्ज फॉर्म उघडा आणि तपशील भरा.

नंतर आवश्यक शुल्क भरा आणि ते सबमिट करा.

शेवटी, फॉर्मची प्रिंटआउट घ्या आणि ती सुरक्षित ठेवा.

Railway Recruitment
Job: फ्रेशर आहात? मुंबई विद्यापीठात नोकरी करण्याची संधी; पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी भरती

दहावी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तु्म्ही किंवा तुमच्या ओळखीमधील कोणी व्यक्ती दहावी उत्तीर्ण असेल तर तु्म्हाला सरकारी नोकरी मिळून शकते. हो, अगदी बरोबर वाचलंय तुम्ही. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आलीय. या नोकरीसाठी पात्रता फक्त १०वी पास आहे.

रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. तुम्हाला secr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येईल. रेल्वेत एकूण १००७ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मे २०१५ निश्चित करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com