CBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

CBI Recruitment: CBI मध्ये नोकरीची संधी अन् भरघोस पगार; पात्रता काय?

CBI Recruitment Under UPSC: यूपीएससीअंतर्गत सीबीआयमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये असिस्टंट प्रोग्रामर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

केंद्रिय लोकसेवा आयोगाने सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये भरती जाहीर केली आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशनमध्ये असिस्टंट प्रोग्रामर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यूपीएससीअंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनमधील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी तुम्हाला https://upsc.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

असिस्टंट प्रोग्रामर पदासाठी २७ जागा रिक्त आहेत. त्यातील ८ जागा या सामान्य प्रवर्गासाठी आहे. इतर जागा राखीव प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२४ आहे.

सीबीआयमध्ये असिस्टंट प्रोग्रामर पदासाठी कॉम्प्युटर अॅप्लिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा एम. टेक कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.ए लेव्हल डिप्लोमा किंवा पीजी डिप्लोमा किंवा कॉम्प्युटर इंजिनियरिंगमध्ये बीटेक केलेले उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. (Government Job)

सीबीआयमधील असिस्टंट प्रोग्रामर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा ३५ वर्ष असावी. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी पे स्केल ७नुसार वेतन मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्जशुल्क २५ रुपये आहे.तर राखीव प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नाचा हट्ट धरला, वाद टोकाला गेला; सनकी बॉयफ्रेंडनं अल्पवयीन गर्लफ्रेंडला निर्घृणपणे संपवलं, मुंबई हादरली

मुंबईत भीषण अपघात, बेस्ट बसने १४ वाहनांना धडाधड उडवले; थरार CCTV मध्ये कैद

Maharashtra News Live Update: मालेगावजवळ कॅटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात,एक ठार

बेड उघडला तर नोटा आणि भिंत तोडली तर सोन्याचा खजिना! माजी ARTO अधिकाऱ्यांच्या घरात कुबेराचा खजिना

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT