SSC Recruitment Saam Tv
naukri-job-news

SSC Recruitment: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; स्टाफ सिलेक्शन कमिशनमद्ये ३९४८१ पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.३९,४८१ रिक्त जागांवर ही भरती करण्यात येणार आहे. १०वी पास तरुणांसाठी नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्सेस, सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स, कॉन्स्टेबर जीडी, आसाम रायफर्ल्स, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये शिपाई पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये ३५,६१२ रिक्त पदे ही पुरुषांसाठी आहेत. तर ३,८६९ रिक्त जागा महिलांसाठी आहे. तर १० टक्के पदे ही माजी सैनिकांसाठी राखीव आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये १५,६५४ पदे रिक्त आहेत.सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्समध्ये ११,५४१ पदे रिक्त आहेत. सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्समध्ये ११,५४१ पदे रिक्त आहे. सीमा सुरक्षा बल पदासाठी ८१९ पदे रिक्त आहेत. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसमध्ये ३,०१७ पदे रिक्त आहेत. सेक्रेटरिएच सिक्युरिटी फोर्समध्ये ३५ पदे रिक्त आहे. आसाम रायफल्समध्ये १,२४८ पदे रिक्त आहेत.नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये २२ पदे रिक्त आहेत.

या नोकरीसाठी १०वी पास उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी १८ ते २३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. १५ ऑक्टोबर २०२४ ही नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (Staff Selection Commission)

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये नोकरीसाठी उमेदवारांची निवड संगणक आधारित ऑब्जेक्टिव्ह परीक्षेद्वारे केली जाणार आहे. या परिक्षेत सामान्य ज्ञान, गणित, इंग्लिश/हिंदी हे विषय असणार आहे. तसेच शारीरिक क्षमता चाचणीदेखील होणार आहे. त्यानंतर शारीरिक मापदंड चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे. यानंतर वैद्यकीय तपासणी आणि कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे.

या नोकरीसाठी तुम्ही १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करु शकतात. तसेच अर्जात बदल करायचा असेल तर तुम्ही ५ ते ७ नोव्हेंबरपर्यंत करु शकतात.या नोकरीसाठी तुम्हाला १८००० ते ६९००० रुपये पगार मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratan Tata : रतन टाटांच्या इन्टरव्ह्यूतील एकेक शब्द हृदयाला स्पर्श करणारा! आयुष्यातील आनंदी आठवण सोशलवर होतेय व्हायरल

College Tips: कॉलेजमध्ये असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra Politics: 'मविआ'ची मोठी खेळी! छगन भुजबळांविरोधात उमेदवार ठरला? दिग्गज काँग्रेस नेत्याने दंड थोपटले

Maharashtra News Live Updates : रवींद्र धंगेकर यांचा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप

VIDEO : अखेर मविआचा तिढा सुटला? 205 जागांचे वाटप पूर्ण

SCROLL FOR NEXT