Government Jobs SAAM TV
naukri-job-news

Government Job: १०वी, १२वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; समाज कल्याण विभागात भरती सुरु; अशा पद्धतीने करा अर्ज

Samaj Kalyan Vibhag Bharti: महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण विभागात सध्या भरती सुरु आहे. ५०० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

१०वी आणि १२ वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. १० वी पास तरुणांकडे सरकारी नोकरी करण्याची चांगली संधी आहे. समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य येथे भरती जाहीर करण्यात आली आहे.समाज कल्याण विभागातील या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.

समाज कल्याण आयुक्तालयात २२९ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. गृहपाल, लघुलेखक, टंकलेखक आणि इतर अनेक पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

समाज कल्याण आयुक्तालयात या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २५,५०० ते ८१,१०० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पर्मनंट नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे.

लघुलेखक पदासाठी उमेदवाराने दहावी पास असणे गरजेचे आहे. त्याचचसोबत इंग्रजी लखुलेखन परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्या व्यक्तीला संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे.लघुटंकलेखक पदासाठी दहावी पास असावे. त्याचसोबत मराठी टंकलेखनाचा वेग असायला हावे.वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असावी. गृहपाल (महिला) पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.

समाज कल्याण आयुक्तालयातील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नो्व्हेंबर २०२४आहे.

NICL मध्ये भरती

नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. असिस्टंट (क्लास ३) पदासाठीही भरती केली जाणार आहे. ५०० रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

ठाकरे गटाला भाजपचा जबरदस्त धक्का! २ बडे नेते मशाल सोडून कमळ हाती घेणार, कार्यकर्तेही भाजपच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT