Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महिला व बालविकास विभागात २३६ पदांसाठी भरती; पात्रता काय?

WCD Bharti: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हाला कोणत्याही परीक्षेशिवाय सरकारी नोकरी मिळवायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १४ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ नोव्हेंबर २०२४ आहे.

महिला व बालविकास विभागात २३६ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. संरक्षण अधिकारी गट बी, प्रोबेशन ऑफिसर गट क, स्टेनोग्राफर, सिनियर क्लर्क, सांख्यिकी सहाय्यक, संरक्षण अधिकारी, सिनियर केअर टेकर या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

महिला व बाल विकास विभागातील या भरतीसाठी १०वी, १२वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पुणे येथे नोकरीचे ठिकाण आहे. सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही खूप मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (WCD Recruitment)

सध्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्येही नोकरीची संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ३०० अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीतून तुम्हाला कामाचा अनुभव मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: भयंकर! लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, झाडाला बांधून अल्पवयीन मुलीचे दोन्ही स्तन कापले

भारतात मोठं काही तरी घडणार? सरकारकडून बँकांना 'लॉकडाऊन सारखे' आदेश

Onion Farmers Protest: कांद्याच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; कांदा उत्पादकांना हवा अडीच-3 हजारांचा दर

हौसेला नाही मोल! कोल्हापुरात जावयासाठी बनवली दीड किलो वजनी चांदीची चप्पल

Kakdiche Sandwich: झटपट आणि हेल्दी नाश्ता हवाय? मग हे काकडीचं सॅंडविच ठरेल बेस्ट

SCROLL FOR NEXT