Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी होणार भरती; जाणून घ्या सविस्तर

Krushi Vibhag Bharti 2024: कृषी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कृषी संशोधन केंद्रात सहाय्यक पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

नुकतेच शिक्षण पूर्ण झालंय अन् नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात कृषी सहाय्यक पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. (Government Job)

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राद्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३८ वर्ष असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. (Krushi Vibagh Bharti)

कृषी सहाय्यक पदाची भरती ११ महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बी.एससी मध्ये दोन पदवी प्राप्त केलेली असावी.तसेच उमेदवारांना शेतीतील कीड आणि रोगांचे ज्ञान असावे.

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत, रायगड येथे ही भरती होणार आहे.या नोकरीसाठी अर्जाचा तपशील तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर मिळेल. हा अर्ज भरुन प्रधान अन्वेषक आणि किटकशास्त्रज्ञ, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र रायगड येथे पाठवायचा आहे. (Krushi Vibagh Job)

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.मुलाखतीच्या वेळी तुम्हाला मूळ कागदपत्रे घेऊन उपस्थित राहायचे आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०२४ आहे. उमेदवारांची मुलाख १८ डिसेंबरला घेतली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT