Income Tax Bharti Saam Tv
naukri-job-news

Income Tax Recruitment: आनंदाची बातमी! इन्कम टॅक्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पगार ८१००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Income Tax Recruitment 2025: आयकर विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेनोग्राफर, टॅक्स असिस्टंट अशा विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आ.कर विभागात स्टेनोग्राफर ग्रेड II, टॅक्स असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना खूप दिवसांआधी जाहीर करण्यात आली होती.

आयकर विभागातील या नोकरीसाठी (Income Tax Recruitment)अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ एप्रिल आहे. त्यामुळे तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी फक्त ३ दिवस उरले आहेत. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

आयकर विभागात एकूण ५६ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. स्टेनोग्राफर ग्रेड II साठी २ जागा रिक्त आहे. टॅक्स असिस्टंट पदासाठी २८ जागा रिक्त आहेत. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी २६ जागा रिक्त आहेत.

स्टेनोग्राफर आणि टॅक्स असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे असावी.मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे असावी.

स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार १२वी पास असणे गरजेचे आहे. टॅक्स असिस्टंट पदासाठी उमेदवाराने ग्रॅज्युएट करणे गरजेचे आहे. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी मॅट्रिक्युलेशन परीक्षा पास केलेली असावी.

स्टेनोग्राफर आणि टॅक्स असिस्टंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला २५,५००, ८१,१०० रुपये पगार मिळणार आहे. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी १८००० ते ५६,९०० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत.

१२वी पास ते ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. सरकारी विभागात नोकरी करायची संधी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला चांगला अनुभव मिळणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला भरघोस पगारदेखील मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT