Government Jobs Saam Tv
naukri-job-news

Government Jobs : इंजिनिअर झालात? सरकारी नोकरीची मोठी संधी, पगार किती? जाणून घ्या सविस्तर

Siddhi Hande

प्रत्येकाची आपल्याला सरकारी नोकरी मिळावी, अशी इच्छा असते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. मात्र, भारत सरकारच्या अनेक कंपन्यांमध्ये परीक्षेशिवाय सरकारी नोकरी मिळत आहे. जर तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेडमध्ये ग्रॅज्युएट इंजिनियरिंग ट्रेनीसह अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे. याबाबत कंपनीने अधिसूचना जाहीर केली आहे.

हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेडमध्ये २१२ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. यामध्ये ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनीसाठी ६७ जागा रिक्त आहे. डिप्लोमा इंजिनियरिंग ट्रेनीसाठी १४५ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत.

ज्या तरुणांनी इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.

ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी पदासाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी पदासाठी १८ ते २७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेडमध्ये भरती प्रक्रिया १ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२४ आहे. (HURL Recruitment)

या नोकरीबाबत अधिसूचना hurl.net.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ही जाहिरात वाचावी.त्यानंतर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. तरुणांसाठी आपल्या करिअरची सुरुवात करण्यासाठी ही चांगली संधी आहे. (Government Job)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Garba King Video : गरबामुळे हार्ट अटॅकचा धोका? मुलासोबत खेळता खेळता अचानक गेला जीव, VIDEO

Fact Check : डासांना मारणाऱ्या कॉईलचा धूर आरोग्यासाठी घातक? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

Maharashtra Politics : शरद पवारांचे भाजप-अजितदादांना धक्के; विधानसभेसाठी काय आखली रणनीती? VIDEO

Ranveer Singh: रणवीर सिंगचा रूबाबदार लूक, एकदा बघाच...

Vinesh Phogat : कुस्तीचा आखाडा, ऑलिम्पिक ते निवडणूक; विनेश फोगाटच्या आयुष्यात ८ तारखेचा मोठा योग

SCROLL FOR NEXT