DTP Maharashtra Recruitment Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महाराष्ट्रात 'या' विभागात सुरु आहे भरती;मिळणार १,३२,००० रुपये पगार

DTP Maharashtra Recruitment: महाराष्ट्रात नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. जवळपास २८९ पदांसाठी ही भरती जाहीर जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्रात सरकारी नोकरी करण्याची इच्छा तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात विविध पदांसाठी भरती सुरु आहे. DTP मध्ये नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.

DTP मध्ये एकूण २८९ जागांसाठी पदांसाठी रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी इच्छूक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. ३० जुलै २०२४ पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२४ आहे. या नोकरीसाठीची जाहिरात अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

रचना सहाय्यक, स्टेनोग्राफर, उच्च श्रेणी स्टेनोग्राफर या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. रचना सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल इंजिनियरिंग किंवा Architecture आणि Construction Technology पदवी प्राप्त केलेली असावी. स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवाराने १० वी पास आणि शॉर्टहँड स्पीड, इग्लिंग टायपिंग आणि मराठी टायपिंगचा कोर्स केलेला असावा. हाय ग्रेड स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत इंग्लिश आणि मराठी टायपिंग स्पीड असणे गरजेचे आहे.

१८ ते ३८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज फी १००० रुपये आहे. रचना सहाय्यक पदासाठी ३८,६०० ते १,२२,८०० रुपये पगार दिला जाणार आहे. तर स्टेनोग्राफर पदासाठी ३८,६०० ते१,३२,३०० पगार दिला जाईल. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२४ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT