Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: दहावी-बारावी पास असणाऱ्यांना सरकारी नोकरीची संधी; ११०० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, वाचा सविस्तर

CCL Recruitment: भारत सरकारअंतर्गत असणाऱ्या कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. कोल्डफिल्ड्स लिमिटेडमध्ये तब्बल ११०० जागांपेक्षा अधिक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. जर तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सरकारच्या मानव संसाधन विकास विभागाच्या सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड कंपनीमध्ये नोकरीची संधी आहे.

CCL कंपनीमध्ये ११०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती सुरु आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही कंपनीची अधिकृत वेबसाइट centralcoalfields.in वर जाऊन अर्ज करु शकतात.

कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्यासाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२४ आहे. सेंट्रल कोल्डफील्ड्स लिमिटेडची ही नोकरी रांचीमधील वेगवेगळ्या विभागात आहे. यामध्ये NAPC ट्रेड, फ्रेशर, टेक्निशियन, ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप या पदासाठी भरती केली जाणार आहे.

इलेक्ट्रिशियन, फिटर, मॅकेनिक डिझेल, वेल्डर, कॉम्प्युटर ऑपरेटर, वायरमॅन, मेडिकल लॅबोरेटरीज टेक्निशियन, इंजिनियरिंग पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार १०वी पास असणे गरजेचे आहे. तसेच त्याच्यासोबत एनटीसी सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. फ्रेशर अप्रेंटिस पदासाठी उमेदवाराने १२ वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत इंजिनियरिंग डिप्लोमा केलेला असणे गरजेचा आहे.

याचसोबत सध्या अनेक बँकांमध्ये भरती सुरु आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकेत अधिकारी पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना भरघोस पगार मिळणार आहे. दोन्ही बँकाच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

SCROLL FOR NEXT