Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: १०वी पास आहात? सुरक्षा मंत्रालयाच्या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करायचा?

BDL Apprentice Recruitment: भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या कंपनीत भरती सुरु झाली आहे.

Siddhi Hande

सरकारी कंपनीत नोकरीची संधी

सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या भारत डायनामिक्स कंपनीत भरती

अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु

शिक्षण पूर्ण झालंय अन् नोकरी शोधताय तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. भारत सरकारच्या कंपनीअंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. विविध ट्रेडमध्ये ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भारत डायनामिक्समधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ८ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. फिटर, इलेक्ट्रिशियमन, मेकॅनिस्ट, वेल्डर अशा अनेक पदांसाठी भरती होणार आहे. विविध ट्रेड विभागात भरती होणार आहे.

भारत डायनामिक्स लिमिटेड ही कंपनी भारत सरकारच्या सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत येते. यामध्ये अप्रेंटिसशिप पदासाठी भरती होणार आहे. त्यामुळे सरकारी कंपनीत काम कसे होते, कशा पद्धतीने काम करावे लागते याबाबत सर्व माहिती मिळणार आहे. अप्रेंटिसशिपमध्ये ट्रेनिंग कालावधीत तुम्हाला स्टायपेंडदेखील मिळणार आहे.

भारत डायनामिक्समधील नोकरीसाठी अर्जप्रकिया ८ डिसेंबरला सुरु होणार आहे. तुम्हाला १२ डिसेंबरपर्यंत अर्ज करायचा आहे. १४ ते ३० वयोगटातील उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. तुम्ही bdl-india.in वर जाऊन अर्ज करु शकतात. कंपनीत एकूण १५६ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

भारत डायनामिक्समधील ही भरती कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. तुमची निवड थेट मेरिट लिस्टद्वारे होणार आहे. त्यामुळे तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्ती केली जाणार आहे.

अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत त्याच्याकडे आयटीआय सर्टफिकेट असावे. या नोकरीसाठी अर्ज करताना राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.

अर्ज कसा करावा? (BDL Recruitment Application process)

सर्वात आधी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाइटवर जायचे आहे.

तिथे तुम्हाला भारत डायनामिक्स लिमिटेड, अप्रेंटिंस असं दिसेल त्यावर क्लिक करा.

यानंतर आधार नंबर, नाव, जन्मतारीख टाकून रजिस्ट्रेशन करायचे आहे.

यानंतर तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे.

यानंतर तुमचा फोटो आणि सही अपलोड करा.

यानंतर अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट आउट काढून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना भेटायला निलेश राणे मालवण नगरपालिकेत दाखल

'आयुष्यात पोकळी..' धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींची भावनिक पोस्ट, मन केले मोकळे

Crime : २ कोटींची लाच मागितल्याने निलंबन, पण PSI काही सुधारला नाही, पैसे डबल करून देतो सांगितलं अन्...

Ghatkopar Railway Station: ३ ब्रीज, एलिव्हेडेड डेक अन्...; घाटकोपर रेल्वे स्टेशनचा कायापालट, प्रवाशांची गर्दीतून होणार सुटका

Actors Death: धर्मेंद्र यांच्या निधनानंतर ३ ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT