Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी;जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु आहे भरती;पात्रता आणि अर्ज कसा करायचा?जाणून घ्या

Job At Collector Office Washim: महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. वाशिममधील जिल्हाधिकारी कार्यालयात क्लर्क या पदासाठी भरती सुरु आहे. पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची सुवर्णसंधी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत अल्पसंख्यांक शासकीय वस्तीगृहाच्या व्यवस्थापनाकरिता भरती जाहीर करण्यात आली आहे. शासकीय वस्तीगृहात ही नोकरीची संधी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या भरतीची जाहिरात निवासी उपजिल्हाधिकारीद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

वाशिम येथील शासकीय वस्तीगृहात नोकरीची संधी आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ८ हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. फक्त महिला उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

लिपिक (क्लार्क)पदासाठी ही भरती केली जाणार आहे. अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.उमेदवार हा मराठी आणि इंग्रजी प्र. मी टंकलेखन पास असणे गरजेचे आहे. उमेदवाराला कॅशबुक लिहण्याचे ज्ञान असावे.उमेदवाराला नोंदवही नीट ठेवण्याबाबत ज्ञान असावे. शासकीय वसतिगृहात येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची माहिती या वहीत लिहली जाते.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना २ ऑगस्टला जिल्हा सेतू समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे अर्ज पाठवायचे आहेत. या अर्जासोबत तुम्ही कागदपत्रांच्या प्रतीदेखील जोडाव्यात. उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT