Government Jobs Saam Tv
naukri-job-news

Government Jobs : तरुणांनो सरकारी नोकरीच्या शोधात आहात?मग ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी ,लगेचच करा अर्ज या विविध पदांसाठी;मिळेल उत्तम पगार

Government Jobs 2024: सध्या प्रत्येकजण सरकारी नोकरीच्या शोधात आहे. जर तुम्हीही त्यातील आहात तर ही बातमी तुमच्यासाठी.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या प्रत्येकजण नोकरीच्या शोधात आहे,मात्र जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात?तर तुम्ही खाली दिलेल्या विविध विभागातील रिक्त पदांसाठी अर्ज करु शकता. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि संपूर्ण प्रक्रिया हे सर्व काही खूप वेगळे आहे. या पदांसाठी अधिकृत वेबसाइटवरूनच संपूर्ण माहिती समजून घेणे चांगले ठरेल.चला तर जाणून घेऊयात या संपूर्ण प्रक्रियेबद्दल.

आरपीएससी सहाय्यक अभियंता भरती २०२४

राज्यस्थान लोकसेवा आयोगान सहाय्यक अभियंका एकत्रित स्पर्धा परिक्षा २०२४ द्वारे तब्बल १०१४ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज '१४ ऑगस्ट २०२४' पासून सुरू होणार असून अर्ज करण्याती अंतिम तारीखही' १२ सप्टेंबर 2024'अशी असेल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी 'rpsc.rajasthan.gov.in तसेच sso.rajasthan.gov.in'या वेबसाइटवर जाऊ शकता.

उमेदवारांनी जर 'बीई' किंवा 'बीटीईसीएच' केलेले असेल आणि त्यांचे वय '२१ ते ४०' असल्यास हे उमेदवार अर्ज करु शकतात. या संपूर्ण पदांच्या भरतीप्रक्रियेसाठी '६००' रुपये फी असेल आणि उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्व आणि मूख्या शिवाय मुलाखतीच्या आधावार केली जाईल,

आरआरबी पॅरामेडिकल भरती २०२४

रेल्वे भर्ती बोर्डाने पॅरामेडिकल स्टाफच्या पदांसाठी भरती (recruiting)प्रक्रिया जाहीर केली आहे. या पदांसाठी तब्बल वेगवेगळ्या १३७६ पदांसाठी उमेदवारांची नियु्क्ती करण्यात येईल. भरती प्रक्रियेतील पदे आहारतज्ज्ञ आणि तंत्रज्ञ यासांठी असेल. उमेदवार अर्ज '१७ ऑगस्ट २०२४' पर्यंत करु शकतात आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ' १६ सप्टेंबर२०२४' असणार आहे. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 'भारतीय रेल्वे.gov.in' या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर निवड परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

आयबीपीएस पीओ आणि एसओ भर्ती २०२४

इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग (banking)पर्सोनेल सिलेक्शन या विभागातून प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदांसाठी तब्बल ४४५५ एवढ्यासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख '२१ ऑगस्ट२०२४' असल्याचे समजते. या साठी उमेदवार फक्त IBPSच्या अधिकृत वेबसाइटवर 'ibps.in'जाऊन फक्त ऑनलाइनच अर्ज करु शकतात.

एचपीएससी मोटर वाहन भरती २०२४

हरियाणा लोकसेवा आयोगाने सध्या मोटार वाहन (vehicle)अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केलेली आहे. इच्छुक उमेदवार 'hpsc.gov.in'या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.महत्त्वाचे म्हणजे अर्ज भरण्याची शेवटची तारीख'२२ ऑगस्ट२०२४' आहे. या पदांसाठी फक्त पदवीधर उमेदवारच अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Maharashtra News Live Updates: अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

SCROLL FOR NEXT