Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरी अन् १२२८०० रुपये पगार; आदिवासी विकास विभागात भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आदिवासी विकास विभागात सध्या भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आदिवासी विकास विभागात भरती सुरु आहे. महाराष्ट्र शासनाच्या सरकारी विभागात नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. नागपूर येथे ही भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागात ११५ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १२ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०२४ आहे. (Adivasi Vikas Vibhag Bharti)

आदिवासी विकास विभागात ११५ रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, मुख्य लिपिक, सांख्यिकी सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लॅब असिस्टंट अशा अनेक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला/विज्ञान / कॉमर्स किंवा कायदा शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी. संशोधन सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने गणित / अर्थशास्त्र / कॉमर्स शाखेत पदवी प्राप्त केलेली असावी. मुख्यलिपिक पदासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात.लघुटंकलेखक पदासाठी १०वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. तसेच त्या व्यक्तीकडे शॉर्टहँड टायपिंगचे प्रमाणपत्र असायला हवे. ग्रंथपाल पदासाठी १०वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. लघुलेखक पदासाठी दहावी आणि बारावी पास उमेदवार अर्ज करु शकतात. याचसोबत उमेदवाराने इंग्रजी टायपिंगचा कोर्स केलेला असावा. (Government Job)

या नोकरीसाठी उमेदवारांनी १९,००० ते १,२२,८०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना १२ नोव्हेंबरपूर्वी अर्ज करावेत. या नोकरीचे ठिकाण नागपूर असणार आहे. या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. (Job Application process)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AUS vs PAK: पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय! 43 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला

Maharashtra News Live Updates: उद्धव ठाकरे यांची मशाल क्रांतीची नसून घराघरांत आग लावणारी- एकनाथ शिंदे

Raj Thackeray : हे राजकारणी नाही, जमिनीचे सौदागर; राज ठाकरेंची राज्यकर्त्यांवर जोरदार टीका

Shahapur News : ग्रामस्थ टाकणार निवडणुकीवर बहिष्कार; समृद्धी महामार्गामुळे रस्ता बंद झाल्याने हिवचे ग्रामस्थ आक्रमक

Travel Special: 'ही' आहेत जगातील सर्वात छोटी विमानतळे, तुम्हाला याबद्दल माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT