Government Job Saam TV
naukri-job-news

Government Job: खुशखबर! महिला व बालविकास विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; अशा पद्धतीने करा अर्ज

Women And Child Developmemt Department Recruitment: महिला वा बालविकास विभागात नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. अध्यक्ष आणि सदस्य या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महिला व बालविकास विभागात (Women And Child Developmemt Department) सध्या भरती सुरु आहे. अध्यक्ष आणि सदस्य या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

महिला व बालविकास विभागातील या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सरकारी विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

महिला व बालविकास विभागात एकूण १४ जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. पुणे या ठिकाणी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांत अर्ज करायचे आहेत. या नोकरीबाबत सविस्तर माहिती http://www.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही संबंधित महिला व बालविकास अधिकाऱ्यांसाठी संपर्क साधा.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२५ आहे. यानंतर अर्ज स्विकारले जाणार नाह. तुम्हाला अर्ज आयुक्त कार्यालय, महिल व बालविकास आयुक्तालय, २८-राणीची बाग, जुन्या सर्किट हाउसजवळ, महाराष्ट्र, पुणे-१ येथे पाठवायचा आहे. यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

भारतीय नौदलात भरती

सध्या भारतीय नौदलातदेखील भरती सुरु आहे. भारतीय नौदलात अग्नीवीर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२५ आहे. इच्छुकांनी इंडियन नेव्हीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dental Care : मोत्यासारखी चमक अन् मजबूत दात, घरच्या घरी बनवा केमिकल-फ्री हर्बल टूथपेस्ट

Maharashtra News Live Update: दुष्काळी परिस्थितीत पाच हजारांची अग्रीम मदत शेतकऱ्यांसाठी ठरली दिलासादायक

Gold Rate : लक्ष्मीपूजनानंतर सराफा बाजारात उलथापालथ! सोन्याच्या दरात प्रतितोळा १०३० रुपयांचा बदल; पाहा आजचे ताजे दर

Fire Tragedy : मध्यरात्री भीषण अग्नितांडव! एकाच कुटुंबातील ६ जणांचा होरपळून मृत्यू

Gautami Patil : गौतमी पाटीलचा दिवाळी लूक पाहिलात का? लाल साडीत खुललं सौंदर्य | PHOTOS

SCROLL FOR NEXT