सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्केल I असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ४ डिसेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०२४ आहे.
जीआयसीमध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. आयबीपीएसद्वारे ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ibpsonline.ibps.in या वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरु शकतात.
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही सरकारी कंपनी आहे. येथे विविध विभागात ही भरती केली जाणार आहे. असिस्टंट मॅनेजर पदासाठी ११० जागा रिक्त आहेत. (GIC Recruitment)
असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बी कॉम/ बीटेक / एलएलबी/ सीएस / आयटी / एमबीबीएस पदवी प्राप्त केललेी असावी. याबाबत सविस्तर माहिती तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन पाहू शकतात. (GIC Recruitment 2024)
या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परिक्षेद्वारे होणार आहे. ही परीक्षा ५ जानेवारी २०२५ रोजी होऊ शकते. या नोकरीसाठी अर्ज करताना तु्म्हाला १००० रुपये अर्ज शुल्क भरु शकतात. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरायची गरज नाही.
NCERT नोकरी
सध्या एनसीईआरटीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. रिसर्च असोसिएट पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर भेट द्या. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ५८००० रुपये पगार मिळणार आहे. पीएचडी पदवी प्राप्त उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.