Income Tax Bharti Saam Tv
naukri-job-news

Income Tax Job: आयकर विभागात नोकरीची सुवर्णसंधी; पगार ८१००० रुपये; पात्रता काय? अशा पद्धतीने करा अर्ज

Income Tax Recruitment 2025: इन्कम टॅक्स विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इन्कम टॅक्समध्ये स्टेनोग्राफर, टॅक्स असिस्टंट या पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे.

Siddhi Hande

जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. आयकर विभागात नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. आयकर विभागा स्टेनोग्राफर ग्रेड II, टॅक्स असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Income Tax Recruitment)

आयकर विभागातील या नोकरीसाठी तुम्ही incometaxhyderabad.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.या भरती मोहिमेत ५६ जागा भरल्या जाणार आहेत.

इन्कम टॅक्समधील या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ एप्रिल २०२५ आहे. ही भरती स्पोर्ट्स कोटाअंतर्गत केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अधिसूचना वाचा. त्यानंतर अर्ज करा.

स्टेनोग्राफर पदासाठी २ जागा रिक्त आहे. टॅक्स असिस्टंट पदासाठी २८ जागा तर मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी २६ जागा रिक्त आहेत. स्टेनोग्राफर पदासाठी १८ ते २७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

स्टेनोग्राफर ग्रेड २ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १२वी पास असणे गरजेचे आहे. टॅक्स असिस्टंट पदासाठी पदवी प्राप्त केलेली असावी. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी मॅट्रिकची परीक्षा पास केलेली असावी.

स्टेनोग्राफर पदासाठी २५५०० ते ८११०० रुपये पगार मिळणार आहे. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी १८००० ते ५६९०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. यानंतर कागदपत्रे पडताळणी आणि मेडिकल टेस्ट घेतली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT