GAIL India Recruitment Saam Tv
naukri-job-news

GAIL Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; पगार १.८० लाख; अर्ज कुठे अन् कसा करावा?

GAIL Recruitment 2026: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. गेल इंडिया लिमिटेडमध्ये सध्या ट्रेनी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत.

Siddhi Hande

सरकारी कंपनीत नोकरीची संधी

गेल इंडिया लिमिटेडमध्ये भरती जाहीर

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

सरकारी कंपनीत नोकरी करायचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सरकारी कंपनी गेल इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. गेल इंडिया लिमिटेडमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल इंडिया लिमिटेडमधील या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाहीये.

भारतातील पीएसयू कंपनी गेल इंडियाने भरतीसंबंधित अधिसूचना जारी केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे.

गेल इंडियामधील या भरती मोहिमेत केमिकल, इन्स्ट्रुमेंट, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल ट्रेडमध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशनद्वारे होणार आहे.

गेल इंडिया लिमिटेडमध्ये एकूण ७० जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या विभागात ही भरती केली जाणार आहे.

पात्रता

एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (केमिकल) पदासाठी केमिकल /पेट्रोकेमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/ केमिकल टेक्नोलॉजी और पॉलीमर साइंस/केमिकल टेक्नोलॉजी विषयात इंजिनियरिंग डिग्री प्राप्त केलेली असावी.

एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (इन्स्ट्रुमेटेशन) पदासाठी इंस्टूमेंटेशन/इंस्ट्रूमेंटेशन& कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स एंड इंस्ट्रूमेंटेशन/इलेट्रिकल एंड इंस्ट्रूमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनियरिंग केलेले असावे.

एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (इलेक्ट्रिकल) पदासाठी इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स एंड पावर, इलेक्ट्रिकल& इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल अँड पॉवरमध्ये इंजिनियरिंग केलेले असावे.

पगार

गेल इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २६ वर्षे असावी. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ६०,०००रुपये ते १,८०,००० रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या कंपनीत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी चेहऱ्यावर लावा कडुलिंबाची पेस्ट, करुन बघा घरगुती उपाय

स्टेजवर नवरदेवाची सटकली; नवरीला मारली लाथ अन् सासऱ्याला ही चोपला, नेमकं काय घडलं?

Dipika Kakar : लिव्हर कॅन्सरनंतर दीपिका कक्करची पुन्हा तब्येत बिघडली, VIDEO शेअर करत आजाराबद्दल सांगितले

IND vs SA: या 3 कारणांमुळे भारताचा दारूण पराभव; सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला लोळवलं

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' दिवशी सुरू होणार मिसिंग लिंक

SCROLL FOR NEXT