वनविभागात नोकरीची संधी
विधी सल्लागार पदासाठी भरती
अर्ज कुठे अन् कसा करावा?
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वनविभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. प्रादेशिक वनवृत्तांर्गत नागपूर व इतर वनभागातील आणि सामाजिक वनीकरण विभागात भरती जाहीर करण्यात आली आहे.अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पूर्व नागपूर येथे रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहेत.
महाराष्ट्र वनविभागाद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुकांनी सर्वात आधी जाहिरात वाचावी. त्यानंतर या नोकरीसाठी अर्ज करावेत. महाराष्ट्र शासन वनसंरक्षक (प्रादेशिक कार्यालय)द्वारे ही भरती जाहीर केली आहे.
पात्रता
विधी सल्लागार या पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.या नोकरीसाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण प्राप्त केलेले असावे.जिल्हा न्यायाधीश, सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश, सेवानिवृत्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा विधी व न्याय विभागातून सेवानिवृत्त सहसचिव/उपसचिव/ अवर सचिव अधिकारी शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेले असावे.
अर्ज कुठे अन् कसा करावा?
नागपूर येथे ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे तुमची या पदासाठी निवड झाल्यावर नागपुर येथे नोकरीसाठी जावे लागेल.या नोकरीसाठी उमेदवाराने अर्ज १७ नोव्हेंबरपर्यंत पाठवायचा आहे. तुम्हाला वनसंरक्षक (प्रादेशिक), नागपूर वनवृत्त,नागपूर, नवीन प्रशासकीय इमारत, शासकीय मुद्रणालयाजवळ, झिरो माईल, नागपूर-४४० ००१ येथे पाठवायचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.