NHAI Recruitment: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात नोकरीची संधी; या पदांसाठी निघाली भरती; लगेच करा अर्ज

NHAI Recruitment 2025: नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टेनोग्राफर ते डेप्युटी मॅनेजर पदांसाठी भरती केली जाणार आहे.
NHAI Recruitment
NHAI RecruitmentSaam Tv
Published On

पदवीधारकांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एमबीए आणि सीए डिग्री प्राप्त तरुणांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच (NHAI)मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एनएचएआयमध्ये डेप्युटी मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स), ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO)सह अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

NHAI Recruitment
Government Job: मंत्रालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पगार मिळणार ८५००० रुपये; अर्ज कसा करावा?

नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियामधील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ३० ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. तुम्हाला nhai.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.

एनएचएआयमध्ये ८४ पदांसाठी भरती केली जाणार आहे. डेप्युटी मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स), ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO), लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट, अकाउंटंट आणि स्टेनोग्राफर ग्रेड II पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

NHAI Recruitment
PGCIL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी अन् २२ लाखांचं पॅकेज; PGCIL मध्ये भरती सुरु; आजच करा अर्ज

पात्रता (Education Qualification)

डेप्युटी मॅनेजर पदसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीए केलेले असावे. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट पदासाठी लायब्ररी सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केलेले असावे. अकाउंटंट पदासाठी ग्रॅज्युएशनसोबत चार्टर्ड अकाउंटंट पदवी प्राप्त केलेली असावी.

अर्ज कसा करावा? (How to Apply)

सर्वात आधी nhai.gov.in वेबसाइटवर जा.

यानंतर होमपेजवर दिलेल्या ABOUT NHAI वर क्लिक करा. यानंतर Vacancy सेक्शवर जा.

यानंतर Sr. No:1, 30-10-2025 वर क्लिक करा.

रजिस्ट्रेशन करा त्यानंतर फॉर्म भरा. कागदपत्रे अपलोड करा.

यानंतर फॉर्म नीट चेक करुन सबमिट करा.

NHAI Recruitment
Metro Jobs: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार मेट्रोत नोकरीची संधी; पगार २.८० लाख; अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com