EPFO Recruitment Saam Tv
naukri-job-news

EPFO Recruitment: EPFO मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

EPFO Recruitment 2025: ईपीएफओमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ईपीएफओमध्ये डायरेक्टर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

अनेकांची सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

ईपीएफओमध्ये डेप्युटी डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. २८ फेब्रुवारी रोजी याबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यानंतर ४५ दिवस म्हणजेच दीड महिन्यात तुम्हाला अर्ज करायचा आहे.

डेप्युटी डायरेक्टर पदासाठी ७ जागा रिक्त आहे. असिस्टंट डायरेक्टर पदासाठी १८ जागा रिक्त आहे. एकूण २५ पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी डेप्युटी डायरेक्टर पदासाठी ३९१०० रुपयांपर्यंत पगार मिळेल.याचसोबत इतर भत्तेदेखील देण्यात येतील.

ईपीएफओच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे असावी.या नोकरीसाठी अर्ज करण्याआधी अधिसूचना वाचावी. त्यानंतर अर्ज आणि त्याचसोबत आवश्यक कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने पाठवायची आहे. तुम्हाला अर्ज श्री दीपक आर्य, क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त २, प्लेट ए, ग्राउंड फ्लोर, ब्लॉक ३, ईस्ट किदवई नगर, नवी दिल्ली ११००२३ येथे पाठवायचा आहे.

इंडियन ओव्हरसीज बँकेत भरती

सध्या इंडियन ओव्हरसीज बँकेतही भरती जाहीर करण्यात आली आहे. ७५० रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मार्च २०२५ आहे. कोणत्याही क्षेत्रात पदवीधर असलेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT