DRDO Recruitment Saam Tv
naukri-job-news

DRDO Recruitment: फ्रेशर्स आहात? DRDO मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; १५० रिक्त पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

DRDO Recruitment 2025: डीआरडीओमध्ये सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. डीआरडीओमध्ये १५० अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. डीआरडीओमध्ये सध्या भरती सुरु आहे. डीआरडीओने गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंट (जीटीआरई)अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

डीआरडीओमधील या नोकरीसाठी तुम्हाला सविस्तर माहिती drdo.gov.in या वेबसाइटवर मिळेल.या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

डीआरडीओमध्ये १५० रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मे २०२५ आहे. या नोकरीसाठी त्यापूर्वी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.

डीआरडीओमध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी (इंजिनिरिंग)साठी ७५ जागा रिक्त आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी (नॉन इंजिनियरिंग) पदासाठी ३० जागा रिक्त आहे. डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनीसाठी २० जागा रिक्त आहेत. आयटीआय अप्रेंटिस ट्रेनी पदासाठी २५ जागा रिक्त आहेत.

ग्रॅज्युएट अप्रेंटिस इंजिनियरिंग पदासाठी उमेदवारांनी बी.ई किंवा बी. टेक पदवी प्राप्त केलेली असावी. ग्रॅज्युएट नॉन इंजिनियरिंग पदासाठी बी.कॉम, बी.एससी, बी.ए, बीबीए पदवी प्राप्त केलेली असावी. डिप्लोमा किंवा आयटीआय अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांनी डिप्लोमा किंवा आयटीआय केलेले असावे.

या नोकरीसाठी १८ ते २७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.यानोकरीसाठी उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेनुसार केली जाणार आहे. यानंतर कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज करु शकतात. तुम्ही अर्ज आणि कागदपत्रे गॅस टर्बाइन अनुसंधान प्रतिष्ठान, डीआरडीओ, सुरक्षा मंत्रालय, पोस्ट बॉक्स नंबर ९३०२, सीवी रमन नगर, बंगळुरु ५६० ०९३ येथे पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर भीषण अपघात,२ वर्षीय मुलीचा मृत्यू तर ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला, टोमॅटोने भरलेला पिकअप उलटला

Mumbai Bomb Threat: मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

SCROLL FOR NEXT