शास्त्रज्ञ होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. डीआरडीओमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. डीआरडीओ भरती आणि मुल्यांकन केंद्र (DRDO-RAC) अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत शास्त्रज्ञ पदांसाठी भरती होणार आहे. (DRDO Recruitment)
डीआरडीओमधील या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. इच्छुकांनी वेबसाइटवर जाऊन आधी माहिती वाचावी, त्यानंतरच अर्ज करावेत. तुम्हाला https://rac.gov.i यावर जाऊन अर्ज करायचा आहे.
डीआरडीओ सायंटिस्ट बी पदासाठी १२७ जागा रिक्त आहेत.ADA मध्ये साइंटिस्ट/इंजीनियर ‘बी’साठी 9 पदे रिक्त आहेत. सायंटिस्ट बी एमकॅडरेड पदांसाठी १२ जागा रिक्त आहेत.या नोकरीसाठीची शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड GATE स्कोरच्या आधारे केली जाणार आहे. या स्कोअरनुसार उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाणार आहे.यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जातील. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तुम्हाला तुमचे चांगले करिअर करायचे असेल तर ही उत्तम संधी आहे. तुम्ही करिअरची सुरुवात करु शकतात. या नोकरीसाठी निवड झाल्यानंतर तुम्हाला भविष्यातदेखील खूप फायदा होणार आहे.
आयआरसीटीसीमध्ये भरती (IRCTC Bharti)
सध्या आयआरसीटीसीमध्येही भरती सुरु आहे. कंसल्टंट पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. चांगल्या सरकारी विभागात नोकरीची ही उत्तम संधी आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. ही भरती मुंबईसाठी होणार आहे. या नोकरीसाठी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.