DRDO Job Saam Tv
naukri-job-news

DRDO Job: परीक्षा नाही, थेट सरकारी नोकरी; डीआरडीओ निघाली भरती, पगार किती? पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

Siddhi Hande

डिफेंस रिसर्च अँड डेव्लपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे डीआरडीओमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. DRDO मध्ये भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी २०० अप्रेंटिस पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

DRDO मध्ये भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला drdo.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २४ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही जाहिरात प्रदर्शित झाल्यापासून २१ दिवसापर्यंत अर्ज करु शकतात.

या भरतीसाठी अप्रेंटिस पदासाठी २०० पदे भरती केली जाणार आहे. त्यात ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी ४० पद आहे. टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा)साठी ४० पदे रिक्त आहेत. ट्रेड अप्रेंटिस (ITI)साठी १२० पदे रिक्त आहेत.

DRDO मध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स आणि , इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, कॉप्युटर सायन्स, मेकॅनिकल, केमिकल)पदवी प्राप्त केलेली असावी. टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, मॅकेनिकल, केमिकल डिप्लोमा) केलेला असावा. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी आयटीआय पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. यामध्ये फिटर, वेल्डर, टर्नर, मेकॅनिक पदासाठी भरती सुरु आहे.

डीआरडीओमधील अप्रेंटिस पदासाठी उमेदवाराचे वय १८ पेक्षा जास्त असावे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मेरिट आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीबाबत शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ई-मेलद्वारे माहिती दिली जाणार आहे. (DRDO Job)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी B.E/B.Tech/Diploma पदवीप्राप्त उमेदवारांनी nats.education.gov.in वर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. तर ट्रेड अप्रेंटिस पदासाठी apprenticeshipindia.org वर रजिस्ट्रेशन करावे लागेल. (DRDO Recruitment)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Politics: 'भंपक माणसांचे राजकारण..', मारहाण प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर संजयकाका पाटील संतापले; रोहित पाटलांवर टीकास्त्र

Vasai News: रक्षकच ठरले भक्षक! विद्यार्थिनीचा पोलिसांकडून विनयभंग, ६ जणांना अटक; वसईतील धक्कादायक घटना

Maharashtra News Live Updates: बोराळा जहांगीर ते खंडाळा शिंदे रस्त्याची अत्यंत दुरवस्था, रस्ता दुरुस्तीची नागरिकांची मागणी

Assembly Election : उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवा; निवडणूक आयोगाला सूचना

Nitanshi Goel: 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीची कमाई ऐकून उडतील होश!

SCROLL FOR NEXT