Central Bank of India Saam Tv
naukri-job-news

Central Bank Job: सेंट्रल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; मॅनेजर ते वॉर्डन विविध पदांसाठी भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Central Bank Recruitment 2025: सेंट्रल बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल बँकेत वॉर्डन ते मॅनेजर अशा अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करायची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियात सरकारी नोकरी (Central Bank Recruitment) करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल बँकेत बीसी सुपरवायजर, वार्ड, काउंसलर, ऑफिस असिस्टंट,वॉचमन या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

सेंट्रल बँकेतील या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही centralbankofindia.co.in वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी विविध पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वेगवेगळी आहे. त्यामुळे तुमच्या पात्रतेनुसार लवकरात लवकर अर्ज करावेत.

सेंट्रल बँकेत ऑफिस असिस्टंट, फॅकल्टी, वॉचमन, अटेंडर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२५ आहे. बीसी सुपरवायजर जालंधर क्षेत्र, कार्यालय सहायक, चौकीदार RSETI जबलपुर और मंडला क्षेत्र येथील पदासाठी १५ एप्रिल २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

काउंसलर एफएलसी पदासाठी २४ एप्रिलपर्यंत अर्ज करु शकतात.RSETI शहदोल, डिंडोरी और अन्नपुर येथील फॅकल्टी ऑफिस असिस्टंट पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२५ आहे. वॉर्डन पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०२५ आहे.

या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे.

अर्ज कसा करावा

तुम्हाला सर्वप्रथम www.centralbankofindia.co.in या वेबसाइटवर जावे लागेल.

यानंतर Recruitment या सेक्शनला भेट द्या.

यानंतर तुम्हाला ज्या पदांसाठी अर्ज करायचा आहे तो फॉर्म भरा.

यानंतर सर्व माहिती व्यवस्थित वाचून घ्या.

ज्या पदांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवावेत.या नोकरीबाबत अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT