Central Bank of India Recruitment  Saam Tv
naukri-job-news

Central Bank Recruitment: सरकारी नोकरीची संधी; सेंट्रल बँकेत भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Central Bank of India Recruitment 2025: सेंट्रल बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बीसी सुपरवायजर आणि कंसल्टंट पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करायची इच्छा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी (Central Bank of India Recruitment) करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल बँकेत सध्या काउंसलर एफएलसी आणि बीसी सुपरवाइजर पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank Of India) ही सरकारी बँक आहे. त्यामुळे तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी मिळणार आहे. सुपरवाइजर पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. सेंट्रल बँकेच्या या नोकरीबाबत सविस्तर माहिती centralbankofindia.co.in या वेबसाइटवर दिली आहे.

सेंट्रल बँकेत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जून २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

पात्रता (Central Bank Eligibility)

सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन, बी.टेक, /बी.ई, एम.एससी, एमबीए /पीजीडीएस किंवा एमसीए पूर्ण केलेले असावे. ही डिग्री प्राप्त असलेले उमेदवारच या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २१ ते ४५ वर्षे असावी. काउंसलर एफएलसी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ४५ ते ६५ असावी.

काउंसलर एफएलसी पदासाठी २५,००० रुपये पगार मिळणार आहे. बीसी सुपरवाइजर पदांसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना १५००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अधिकृत वेबसाइटवरुन अर्जाचा नमुना डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर फॉर्म भरुन पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Almond Jaggery Puran Poli Recipe : वाटीभर बदाम अन्...; गणपतीसाठी बनवा मऊ- लुसलुशीत पुरणपोळी

SCROLL FOR NEXT