CBSE Recruitment Saam Tv
naukri-job-news

CBSE Recruitment: १२ वी पास तरुणांसाठी नव्या वर्षात सरकारी नोकरीची संधी;अर्ज कुठे अन् कसा कराल?

CBSE Recruitment 2025: १२वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. नवीन वर्षात सीबीएसईमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रिय माध्यमिक शिक्षक बोर्डात नोकरीची सुवर्णसंधी आहे. सीबीएसईमध्ये ज्युनिअर असिस्टंट आणि सुपरिटेंडेंट पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहे. (CBSE Recruitment 2025)

सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच www.cbse.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सीबीएसईच्या या भरती मोहिमेत २१२ रिक्त पदे भरती केली जाणार आहे. त्यातील १४२ पदे ही सुपरिटेंडेंट पदासाठी रिक्त आहेत.त्यातील ७० पदे ही ज्युनिअर असिस्टंट पदासाठी आहे. (Government Job)

सुपरिटेंडेंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. ज्युनिअस असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १२वी पास केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला इंग्रजी आणि हिंदी टायपिंग येणे गरजेचे आहे.

ज्युनिअर असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे असावे. तर सुपरिटेंडेंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे असावे.आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरायची गरज नाही.

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम www.cbse.gov.in या साइटवर जावे.

त्यानंतर Recruitment सेक्शनवर जाऊन संबंधित पदाच्या अर्जावर क्लिक करा.

यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करुन लॉग इन करावे.

यानंतर आवश्यक कागदपत्रे, सही आणि फोटो अपलोड करावे.

त्यानंतर अर्ज शुल्क भरावे आणि फॉर्म सबमिट करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pranit More : ३७० रुपयांच्या बिर्याणी वादात प्रणीत मोरेला प्रसिद्ध अभिनेत्याचा पाठिंबा; ट्रोलर्सना सुनावले खडेबोल, म्हणाला...

Maharashtra News Live Update : भिमाशंकर मंदिर उघडण्याआधी मुख्यमंत्र्यांचा दौरा

Horoscope Today: कोणाला मिळणार गुड न्यूज, कोणाला धनलाभ? पाहा सर्व १२ राशींचे आजचे भाग्य

मुंबईतून धक्कादायक बातमी! भीषण अपघातात ज्येष्ठ शिवसैनिकाने गमावला जीव; परिसरात हळहळ

Pune Fort : पुरंदरच्या शेजारी उभा आहे पराक्रम अन् शौर्याचा साक्षीदार, 'हा' ऐतिहासिक किल्ला पाहिलात का?

SCROLL FOR NEXT