Pune Fort : पुरंदरच्या शेजारी उभा आहे पराक्रम अन् शौर्याचा साक्षीदार, 'हा' ऐतिहासिक किल्ला पाहिलात का?

Shreya Maskar

पुरंदर किल्ला

पुरंदर किल्ला पुणे येथे पश्चिम घाटात वसलेला आहे. पुरंदर किल्ला छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. हा इतिहासातील महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक आहे.

Purandar Fort | google

जुळे किल्ले

पुरंदर आणि वज्रगड ज्याला 'रुद्रमाल' असेही म्हणतात. पुरंदर आणि वज्रगड या दोघांना पुरंदरची जुळी गड-किल्ल्यांची जोडी म्हणतात. हे किल्ले समुद्रसपाटीपासून ४,४७२ फूट (१,३६३ मीटर) उंचीवर स्थित आहेत.

Twin Castles | google

किल्ल्यांचा उद्देश

या जुळ्या किल्ल्यांची रचना अत्यंत भक्कम संरक्षणाच्या उद्देशाने करण्यात आली होती. यात पुरंदर हा मुख्य आणि विशाल किल्ला आहे, तर तुलनेने लहान असलेला वज्रगड त्याच्या पूर्वेकडील कड्यावर पहारा देत शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम करतो.

Purpose of forts | google

वज्रगड किल्ला

पुण्याजवळ नारायणपूर या पायथ्याच्या गावाजवळ असलेला वज्रगड किल्ला आहे. हे दोन्ही किल्ले ट्रेकिंगसाठी उत्तम आहे.

Vajragarh Fort | google

वज्रगड किल्ला कोणी बांधला?

वज्रगड किल्ला १३ व्या शतकाच्या सुमारास देवगिरीच्या सेउना यादव राजांनी तो बांधला असावा, असे ऐतिहासिक मतप्रवाह दर्शवतात. निश्चित माहिती नाही.

Who built Vajragarh Fort? | google

पुरंदर किल्ला कोणी बांधला?

पुरंदर किल्ल्याची मूळ रचना ११ व्या शतकात यादव घराण्याने उभारली होती; त्यानंतर १४ व्या शतकात बहामनी सल्तनतीने त्यात तटबंदी आणि मुख्य भिंतींची भर घातली.

Who built Purandar Fort? | google

इतिहास

वज्रगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख किल्ला असलेल्या पुरंदर किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी धोरणात्मक टेहळणी बुरूज म्हणून काम करत होता.

History | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Purandar Fort | google

NEXT : गणपतीपुळे जवळील भव्य ऐतिहासिक ठिकाण, 'हा' किल्ला फारच कमी लोकांना माहितेय

Ganpatipule | saam tv
येथे क्लिक करा...