Ganpatipule : गणपतीपुळे जवळील भव्य ऐतिहासिक ठिकाण, 'हा' किल्ला फारच कमी लोकांना माहितेय

Shreya Maskar

गणपतीपुळे

कोकणातील जयगड किल्ला हा १६ व्या शतकातील एक सागरी किल्ला आहे, तो शास्त्री नदी आणि अरबी समुद्र यांच्या संगमाकडे पाहणाऱ्या एका कड्यावर वसलेला आहे.

Ganapatipule | pinterest

जयगड किल्ला

जयगड किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळेपासून साधारणपणे २० किमी अंतरावर आहे. त्यामुळे गणपतीपुळे येथे गेल्यावर या ऐतिहासिक ठिकाणाला नक्की भेट द्या.

Jaigad Fort | google

किल्ला कोणी बांधला?

जयगड किल्ला, विजयाचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो. हा किल्ला मूळतः विजापूर सल्तनत (आदिलशाही घराण्याने) 16 व्या शतकात बांधला होता.

Who built the fort? | google

इतिहास

शिवकाळात जयगड किल्ला एक मोक्याचा मराठा नौदल गड होता. कोकण किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी प्रख्यात ॲडमिरल कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखालील मराठा नौदल ताफ्यासाठी हा किल्ला महत्त्वाचा तळ होता.

History | google

कसं जाल?

रत्नागिरी स्टेशनला उतरून तुम्ही पुढे एसटी बसेस किंवा खाजगी टॅक्सीने जयगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचाल. गणपतीपुळेवरून जयगड किल्ल्यासाठी टॅक्सी किंवा खासगी वाहनांद्वारे १९ किमीचे अंतर अवघ्या ३० मिनिटांत गाठता येते.

how do you go | google

गणपतीपुळे मंदिर

श्री गणपतीपुळे मंदिर हे 400 वर्ष जुने, स्वयंभू भगवान गणेशाच्या अखंड मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर हे मंदिर वसलेले आहे.

Ganapatipule Temple | pinterest

गणपतीपुळे समुद्रकिनारा

प्राचीन, पांढरी वाळू, शांत वातावरण यासाठी गणपतीपुळे प्रसिद्ध आहे. तुम्ही येथे बोटिंगचा आनंद घेऊ शकता. समुद्रकिनारी गणपतीपुळे मंदिर असल्यामुळे येथील वातावरण मंगलमय असते.

Ganpatipule Beach | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : कोल्हापूरचा अभिमान! ऐतिहासिक विशाळगडला आधी कोणत्या नावानं ओळखलं जायचं?

Vishalgad Fort | saam tv
येथे क्लिक करा...