Vishalgad Fort : कोल्हापूरचा अभिमान! ऐतिहासिक विशाळगडला आधी कोणत्या नावानं ओळखलं जायचं?

Shreya Maskar

कोल्हापूर

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात विशाळगड किल्ला वसलेला आहे. हा शिवकालीन इतिहासातील महत्त्वाचा किल्ला आहे. तुम्ही सुट्ट्यांमध्ये येथे नक्की भेट द्या.

Kolhapur | google

कोल्हापूर कशासाठी प्रसिद्ध

कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर आहे, जे आपल्या प्राचीन महालक्ष्मी मंदिर, हाताने बनवलेल्या कोल्हापुरी चपला , मसालेदार पदार्थ, पारंपरिक भारतीय कुस्ती, राजवाडे यांसाठी ओळखले जाते.

What is Kolhapur famous for? | google

विशाळगड किल्ला

विशाळगड किल्ला मूळतः खेळणा किंवा खिलना म्हणून ओळखला जात असे. इतिहासामध्ये या किल्ल्याला 'खिलगिला', 'खिलकिला' अशीही विविध नावे मिळाली होती.

Vishalgarh Fort | google

विशाळगड नावाचा अर्थ

'विशाळगड' या नावाचा मराठीत अर्थ 'भव्य किंवा महाकाय किल्ला' असा होतो. गड म्हणजे किल्ला होय.

Vishalgad name meaning | google

किल्ला कोणी बांधला?

इतिहासकारांच्या मते, विशाळगड किल्ला १०५८ मध्ये कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील राजा मारसिंह याने बांधला होता.

Who built the fort? | google

ऐतिहासिक महत्त्व

पन्हाळ्याचा वेढा भेदल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावर आश्रय घेतला होता. मूळचे 'खेळना' हे नाव असलेला हा किल्ला शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये आदिलशाही सैन्याकडून जिंकून घेतला आणि त्याचे नाव बदलून 'विशाळगड' असे ठेवले.

Historical significance | google

कसं जाल?

कोल्हापूरहून विशाळगडचे अंतर सुमारे ७५ ते ८० किमी आहे. तुम्ही कोल्हापूर स्टेशनला उतरल्यावर पुढे एस.टी. बस , खाजगी टॅक्सीने कोल्हापूर - गगनबावडा - मलकापूर मार्गे विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत (मलकापूर) सहज पोहोचू शकता. पुढे छोटा ट्रेक करा.

how do you go | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT :  भव्य प्रवेशद्वार, प्राचीन तोफा अन् तलाव; लोणावळ्याजवळ वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला

Fort Near Lonavala | saam tv
येथे क्लिक करा...