BEL Recruitment Saam Tv
naukri-job-news

BEL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती; अर्ज कसा करावा?

Bharat Electronics Limited Recruitment: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ट्रेनी इंजिनियर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी

ट्रेनी इंजिनियर पदासाठी भरती

अर्ज कुठे अन् कसा करावा?

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनियर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ६१० पदांसाठी ही भरती होणार आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनियर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरुदेखील झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही bel-india.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.

पात्रता

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील ट्रेनी इंजिनियर पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई, बीटेक किंवा बीएससी पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत विविध विभागातील पदासाठी पात्रता वेगवेगळी असणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

पगार

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २८ पेक्षा जास्त नसावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ३०,००० रुपये पगार मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी ३५,००० रुपये आणि तिसऱ्या वर्षी ४०,००० रुपये पगार मिळणार आहे.

निवडप्रक्रिया

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. ही लेखी परीक्षा ९० मिनिटांची असणार आहे. याचसोबत या परीक्षेत निगेटिव्ह मार्केटिंगदेखील असणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १७७ रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरायचे नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack : भरवस्तीत बिबट्याचा हल्ला; वडिलांसोबत खेळत असलेल्या चिमुकल्याला नेले उचलून

Sara Tendulkar: बोल्ड असो वा सिंपल, साराच्या 'या' फोटोमध्ये आहे खास गोष्ट; कारण जाणून घ्या

Maharashtra Live News Update: २६ सप्टेंबरपासून मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

Janhvi Kapoor : 'परम सुंदरी' जान्हवीने नेसली आईची साडी, चाहते म्हणाले सेम श्रीदेवी!

Dr D.B Kadam Death : सुप्रसिद्ध डॉ. डी. बी. कदम यांचे दीर्घ आजाराने निधन, वैद्यकीय विश्वात हळहळ

SCROLL FOR NEXT